Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्रमा प्लुटोशी युती करीत असुन सिद्ध योगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!
आज चंद्र प्रतिकूल परिणाम देणारं आहे. लांबच्या प्रवासात अडथळे येऊ शकतात. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. नको तेथे खर्च झाल्यामुळे चिडचिड होईल. करियरमध्ये जास्त लक्ष दिल्यास यशस्वी व्हाल. कोणतेही संशोधन चांगले कराल. खोट्याचा किंवा नको त्या गोष्टीचा आधार मात्र घेऊ नका. अशा गोष्टी तुम्हाला गोत्यात आणू शकतात.कोणताही निर्णय घेण्यात दिरंगाई झाल्यामुळे दारात आलेली संधी दार ठोठावून निघून जाण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. स्थानबदलाची शक्यता आहे. रागाचा अतिरेक टाळावा. आळसाचा अतिरेक होईल. स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होईल. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते. मानसिक क्लेश अस्वस्थता जाणवेल.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.
आज चंद्रबल लाभल्याने आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे रहाल. साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्याना आदर वाटेल. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे रहाल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. नोकरीत मना सारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. कौटुंबिक सुखशांती आनंद दायक वातावरण राहिल. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल.
शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०५, ०८.
आज चंद्रभ्रमण आणि ग्रहमान अनुकुल असल्याने आकर्षक बोलण्यामुळे लोकांच्या पोटात शिरून काम करवून घ्याल. खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल. उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि अंतःस्फूर्तीच्या जोरावर जनमानसात प्रभाव पाडाल. चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. समस्या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा. जास्तीत जास्त एकांतवास आवडेल. रोजगारात मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहु नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहिल. आंनदाची बातमी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.
आज शुभ स्थानातील ग्रहयोग पाहता व्यवसायात खूप काम कराल आणि त्याचा लाभही तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आनंदी उत्साही रहाल. नवीन स्थावर घेण्यासाठी प्रयत्नात रहाल. नोकरीत बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. मित्रमंडळी बरेच दिवसांनी भेटतील. गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत. कलेत हाती घेतलेल्या कामात यशस्वी रहाल. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. प्रतिभेस वाव मिळेल. नोकरीत बढ़ती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. संपत्तीबाबत असलेल्या कामात केलेली धावपळ फायदेशीर राहिल. रोजगारात नवीन योजना राबवाल.
शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०९.