Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मकर राशीच्या लोकांसाठी उत्तम दिनमान! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मकर राशीच्या लोकांसाठी उत्तम दिनमान! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मकर राशीच्या लोकांसाठी उत्तम दिनमान! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mar 29, 2024 02:10 PM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction today 29 march 2024 : आज २९ मार्च २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ , मीन
धनु, मकर, कुंभ , मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज बव करण आणि वज्र योगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनु: 

आज अनिष्ट ग्रहमान असल्याने दिवस प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणारा आहे. मानसिकता बिघडल्या मुळे काही गोष्टींना खीळ बसण्याची शक्यता आहे. बौद्धिक बाबतीत उत्कृष्ट फळे मिळतील. मुलांशी मतभेद होतील. अती भावनाप्रधानता टाळायला हवी. नोकरी व्यवसायात जोखमीचे निर्णय घेणे टाळावे. धंद्यात कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक न केलेली बरी राहील. मानसिक परेशानी क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. आर्थिक हानी होण्याची संभवना आहे. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आरोग्य बाबतीत विशेष काळजी घ्यावी.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०४, ०६.

मकर: 

आज चंद्रबल उत्तम असल्याने आणि चंद्र-शुक्र योगात बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना योगकारक दिवस आहे. प्रेमवीरांनी आपले प्रेम आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करण्यास चांगला दिवस आहे. व्यवसायात तुम्ही केलेल्या नियोजनामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. अवखळ मनाला विवेकाचे लगाम घालावे लागतील. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळाल्यामुळे कामाची गती वाढेल. शासकीय सेवेतील मंडळीना देखील उत्तम दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदन मिळेल. दुसर्‍याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील. विरोधक आक्रमक होतील त्यांचा वेळीच बिमोड कराल तर यशस्वी व्हाल.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०७, ०८.

कुंभः 

आज वज्र योगात शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र जोखीम घेण्याचे टाळावे. तुमच्या विक्षिप्त स्वभावाचा फायदा इतर घेणार नाही याची काळजी घ्या.अविचाराने कर्ज काढू नका. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल.चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहिल. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि संततीची विशेष काळजी घ्या.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०८.

मीनः 

आज चंद्र मंगळ संयोगात आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. जुनी येणी वसूल होतील. एखादी गोष्ट धडाडीने करण्यात तुमचा पुढाकार राहील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यशस्वी व्हाल. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. कोणतीही टोकाची भूमिका घेण्याअगोदर सुवर्णमध्य काढावा लागेल. नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.व्यापारात लाभ होईल. संपादन क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

Whats_app_banner