dhanu makar kumbh meen horoscope today : 'या' चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र असेल!-dhanu makar kumbh meen rashi today 27 march 2024 sagittarius capricorn aquarius pisces zodiac signs prediction ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  dhanu makar kumbh meen horoscope today : 'या' चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र असेल!

dhanu makar kumbh meen horoscope today : 'या' चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र असेल!

HT Marathi Desk HT Marathi
Mar 27, 2024 01:37 PM IST

dhanu makar kumbh meen rashi today 27 march 2024 : धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य

'या' चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र असेल! वाचा राशीभविष्य
'या' चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र असेल! वाचा राशीभविष्य

धनु

आजचं चंद्रगोचर संमिश्र परिणाम देईल. तुमच्यातील कलागुण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न कराल. कष्टाचं चीज होईल. आयत्या वेळच्या खर्चासाठी तरतूद करून ठेवा. हितशत्रूंचा त्रास जाणवेल. नोकरीत आतातायीपणा टाळा. तुमच्या हुशारीवर वरिष्ठ खूष होतील. रोजगारात आशादायी परिस्थिती राहील. समाजात मानमरातब वाढेल. मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. वाद होऊ शकतात. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीत यश मिळेल. नवीन मित्र जोडले जातील. शुभरंग: पिवळा शुभदिशा: ईशान्य. शुभअंकः ०३, ०७.

मकर

अडलेली कामं मार्गी लागतील. घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढेल. पण, तुम्ही परिस्थिती योग्य पद्धतीनं हाताळाल. सिनेसृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचा योग आहे. आपल्या महत्वाकांक्षेनुसार यश मिळेल. भाग्यदायी दिनमान आहे. नशिबाची साथ लाभेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक, सामाजिक कार्य घडेल. तीर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्यानं आनंदी राहाल. शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम. शुभअंकः ०२, ०८.

कुंभ

ग्रहयुतीत आज व्यक्तीगत समस्या निर्माण होतील. अंथरुण पाहून पाय पसरा. चांगल्या वाईट गोष्टी मनावर घेऊ नका, अन्यथा त्रास होईल. बौद्धिक आणि वैचारिक पात्रता वाढेल, त्याची नोंद सगळे घेतील. कौटुंबिक जबाबदारीकडं लक्ष द्या. आहार समतोल ठेवा. मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन, पोटदुखी याकडं दुर्लक्ष करू नये. नोकरी, व्यवसायात काही प्रमाणात त्रास होईल. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. प्रवासात नुकसान होईल. प्रवासात काळजी घ्या. शुभरंग: जांभळा शुभदिशा: नैऋत्य. शुभअंकः ०७, ०८.

मीन

चंद्रभ्रमण आज अशुभ स्थानातून होत आहे.  दिवस मध्यम स्वरूपाचा राहील. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वाट पाहावी लागेल. घरातील खर्चात वाढ होईल. नोकरीनिमित्त घराबाहेर राहावं लागेल. दुसऱ्यांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही. लहरी स्वभावामुळं इतरांना तोंड द्यावं लागेल. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मानापमानाचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात समाधान वाटणार नाही. वाहन, घर बदलण्याचे प्रसंग घडतील. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई करू नका. शुभरंग: पिवळसर शुभदिशा: ईशान्य. शुभअंकः ०१, ०९.