Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : धनु, मकर, कुंभ आणि मीन… या राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? पाहा
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : धनु, मकर, कुंभ आणि मीन… या राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? पाहा

Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : धनु, मकर, कुंभ आणि मीन… या राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? पाहा

Mar 24, 2024 08:59 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction today 24 march 2024 : राशीचक्रातील धनु, मकर, कुंभ व मीन राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य

Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : धनु, मकर, कुंभ आणि मीन… या राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? पाहा
Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : धनु, मकर, कुंभ आणि मीन… या राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? पाहा

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces horoscope today 24 march 2024 : आज रविवारी (२४ मार्च) हुताशनी पौर्णिमेचा चंद्र सुर्याच्या नक्षत्रातुन आणि रवि, बुधाच्या राशीतुन भ्रमण करणार आहे. चंद्र केतुशी देखील संयोग करीत असुन ग्रहणयोग घटीत होत आहे. आज गंड योगात राशीचक्रातील धनु, मकर, कुंभ आणि मीन यांच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? ते जाणून घेऊया.

धनुः आज प्रतिकूल ग्रहयुतीमुळे दुर्मिळ गोष्टींचा संग्रह कराल. झोपेची तक्रार राहील. व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. दुसरे काय म्हणतात यापेक्षा तुमचे अंतर्मन तुम्हाला काय सांगते याचा विचार करावा. काम करण्यासाठी बुद्धीबरोबर चिकाटीही हवी शक्ती आणि युक्तीचा सुरेख संगम व्यवहारात दिसेल. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. परंतु वेळीच सर्व गोष्टी उघड बोलून वातावरण थंड कराल. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. फाजिल आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. 

शुभरंगः पिवळसर शुभदिशाः ईशान्य.शुभअंकः ०३, ०७.

मकरः आज चंद्रगोचरात जुनी येणी वसूल होतील. कष्ट खूप करावे लागले तरी यशाचा मार्गही दृष्टीक्षेपात असल्यामुळे कष्टाचे काही वाटणार नाही. कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम रहाणार आहात. घरात वेळ देऊ शकणार नसल्यामुळे मनावर थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदन मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. दुसर्‍याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे.

शुभरंगः जांभळा शुभदिशाः पश्चिम.शुभअंकः ०२, ०७.

कुंभः आज गंड योगातील चंद्रभ्रमणात समजूतदार आणि सोशिक होऊन घरातील अनेक अडचणी सोडवाल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर राहून ध्येयाप्रत पोचण्याचा फार मोठा गुण तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यावर मात कराल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होईल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहिल. मुलांच्या बाबतीत शारिरिक समस्या निर्माण होतील. 

शुभरंगः निळा शुभदिशाः नैऋत्य.शुभअंकः ०४, ०८.

मीनः आज अनिष्ट चंद्रभ्रमणात सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. तुमचा अहंकार कधी दुखावेल हे सागता येत नाही आणि त्यातून कौटुंबिक वातावरणही निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरच होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनी मित्रांपासून दुर राहा. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आरोग्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. 

शुभरंग: पिवळा शुभदिशाः ईशान्य.शुभअंकः ०३, ०५.

Whats_app_banner