मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : कुंभ राशीच्या लोकांचे नुकसान होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : कुंभ राशीच्या लोकांचे नुकसान होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 23, 2024 11:27 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction today 23 march 2024 : आज २३ मार्च २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल शनिवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज चंद्र सिंह राशीत भ्रमण करणार असून, गजकेसरी व शूल योगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनु: 

आज गुरू-चंद्र योगात आपणास दिनमान उत्तम राहील. पित्यापासून अथवा वडिलधाऱ्या व्यक्ती पासून आर्थिक लाभ होतील. नोकरीत असाल तर बढतीचे योग आहेत. लोकांना पटेल रुचेल असेच वक्तव्य करा. विलासी वस्तूंची खरेदी कराल. आपला आत्म विशास वाढीस लागेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लागेल. मित्रमैत्रिणी नातेवाईका कडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहिल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहिल.स्वभावातील गुणदोषं मात्र टाळावेत. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. शासकिय योजनेतून लाभ होईल. एकंदरीत आजचं दिनमान उत्तम आहे.

शुभरंग: पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.

मकर: 

आज चंद्र गुरूशी योग करीत आहे. आपला राशीस्वामी शनि उत्तम स्थितीत आहे. झेपणारे काम स्वीकाराल. आर्थिक स्थिती उत्तम होईल. सोबतच आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम असाल. सामाजिक उत्सवात सहभाग समाजातील बऱ्याच प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्काला आणण्याची संधी देईल. आपल्या वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरावर पडेल. कुटुंबामधून आपणास सुवर्ता मिळणार आहे. आपल्याला अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संतती विषयी चिंता मिटेल. जमीन खरेदी विक्री तून अधिक लाभ होईल.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.

कुंभ: 

आज चंद्रबल अनिष्ट अशुभ परिणाम देईल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. योग व व्यायामात सातत्य ठेवा. खर्चाला लगाम घाला. वैचारिक भेदामुळे कौटूंबिक नात्यामध्ये दूरी येण्याचे योग आहे. पालकांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चंचलपणावर आवर घाला. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रु पक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याबाबत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभरंग: जांभळा, शुभदिशाः नेॠत्य, शुभअंकः ०७, ०८.

मीनः 

आज राशीस्वामी गुरू चंद्राशी संयोग करतोय. संधींना आपल्या हातातून जाऊ देऊ नका. करिअरची गती काहीशी कमी होतांना दिसेल. नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा वरिष्ठ देऊ करतील. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

WhatsApp channel