Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मकर राशीच्या लोकांची दगदग होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मकर राशीच्या लोकांची दगदग होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मकर राशीच्या लोकांची दगदग होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mar 22, 2024 10:41 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction today 22 march 2024 : आज २२ मार्च २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ, मीन
धनु, मकर, कुंभ, मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज चंद्र सिंह राशीत भ्रमण करणार असून, लक्ष्मीयोगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनुः 

आज चंद्रबल उत्तम असल्याने अत्यंत शुभ दिनमान असेल. नोकरी व्यवसायात नवीन क्षितीजे साद घालतील. परंतु त्याचा खोलवर अभ्यास करणे हिताचे ठरेल. दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र कसूर करू नये. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जादा काम करावे लागेल. आपल्या शांतीप्रिय स्वभाव आणि गुणवैशिष्टया मुळे पुरेपूर फायदा होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिनमान आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहिल. आपल्या वाणीचा इतरावर प्रभाव राहील.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.

मकर: 

आज प्रतिकूल वातावरण राहिल. मनामध्ये मात्र प्रचंड खळबळ असा अनुभव येईल. जवळच्या मित्राच्या भरवशावर रहाल परंतु त्यापासून लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. जोडीदाराच्या अचानक चांगल्या वाईट वागण्यामुळे तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्बेतीची काळजी घ्या. वेळेवर औषधोपचार घ्या. काहींना परदेशात प्रवास घडुन येतील. स्वभावानुसार मानसिक चिडचिड दगदग होईल. विरोधकांचा त्रास सहन करावा लागणार आहे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. वाईट संगत अंगलट येईल.मानसिक क्लेशातून त्रासातुन जावे लागणार आहे. अनैतिक कामापासुन दुर रहा अन्यथा कायद्याच्या कचाट्यात अडकाल.

शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०१, ०५.

कुंभः 

आज चंद्र गोचरात चंचल स्वभावाला थोडा आळा घालावा लागेल. धडाडीने एखादे काम पूर्ण करणे या गोष्टी संभवतात. शैक्षणिक क्षेत्रात संशोधनही चांगल्या प्रकारे करू शकता. अभ्यासात प्रगती करून घेता येईल. खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. परदेश गमनाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग येतील. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. तेव्हा व्यवहार जपूनच करावा. नविन संधी प्रस्ताव येतील. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. घाईगडीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील.

शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०६, ०८.

मीन: 

आज केतुचं स्वामित्व असणाऱ्या नक्षत्रातुन चंद्र भ्रमण होत आहे. आर्थिक गुंतवणूक कराल. आपले सर्व व्याप सांभाळून धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. बौद्धीक कसरती करण्याबरोबरच मनोरंजन करण्याकडेही कल राहील. धंद्यात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. घरात नोकरवर्गाचे सहकार्य न मिळाल्यामुळे नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. आपले मनोबल आत्मविश्वास उंचावलेला असेल. कोणत्याही स्वरूपाच्या वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ नका. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. अन्यथा स्वताचे नुकसान करून घ्याल. नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल.

शुभरंगः पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.

Whats_app_banner