Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : कुंभ राशीच्या लोकांना लाभाची सुखद संधी मिळेल! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : कुंभ राशीच्या लोकांना लाभाची सुखद संधी मिळेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : कुंभ राशीच्या लोकांना लाभाची सुखद संधी मिळेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Published Mar 21, 2024 10:50 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction today 21 march 2024 : आज २१ मार्च २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल गुरुवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ, मीन
धनु, मकर, कुंभ, मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज चंद्र कर्क राशीत भ्रमण करणार असून, सुकर्मा योगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनुः 

आज चंद्राचा प्लुटोशी योग होत आहे. नोकरी व्यवसायात मनासारखे कार्यामुळे तब्येत खूष राहील. सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. ज्यांचे परदेशात व्यवहार आहेत त्यांना तेथून चांगले संकेत मिळाल्यामुळे छोटी ट्रीप करावीशी वाटेल. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर यांच्यासाठी शुभदिवस आहे. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.

मकर: 

आज चंद्रबल उत्तम असल्याने लोकांना संघटित करण्याबाबत विशेष रूची ठेवाल. राजकारणी लोकांना आपल्या कामामध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. प्रेमीजनांना प्रेम प्रकरणात अडथळे संभवतात. कोणत्याही निर्णयात ठामपणा नसल्यामुळे कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लागेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. सहकाऱ्यांसोबतचे वाढविवाद मात्र टाळावे.

शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०४, ०८.

कुंभ: 

आज चंद्र गोचर शुभ स्थानातून होत आहे. एक प्रकारची प्रेरणा आतून निर्माण होईल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. कल्पनाशक्ती आणि दूरदर्शी पणाच्या जोरावर लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. गैरसमज, वितंडवादाची गाठोडी मागे टाकून पुढे जाल तर सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. फाजिल आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहिल.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०६, ०८.

मीनः 

आज प्लुटो-चंद्र युती योगात उत्कृष्ट बुद्धीमत्ता आणि अचाट स्मरणशक्ती असल्यामुळे हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. मुळापर्यंत जाऊन अभ्यास करण्याची वृत्ती आणि मुडी स्वभाव यामुळे तुम्ही जरा जगावेगळे वाटता. शिवाय काळाच्या पुढे विचार करणारे असता. कोणत्याही गोष्टीसाठी पराक्रमाची शर्थ कराल. अडचणी येतील. परंतु एकंदरीत यशाकडेच वाटचाल रहाणार आहे. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्य पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकां कडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०६

Whats_app_banner