मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मीन राशीच्या लोकांच्या वैवाहिक सुखात वाढ होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मीन राशीच्या लोकांच्या वैवाहिक सुखात वाढ होईल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 20, 2024 02:10 PM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction today 20 march 2024 : आज २० मार्च २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल बुधवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ, मीन
धनु, मकर, कुंभ, मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज चंद्र राहु, बुध रवि, आणि नेपच्युन या चार ग्रहांशी संयोग करीत आहे. धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनुः 

आज चंद्राशी होणारा योग पाहता प्रतिकुल परिणाम येण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे चांगुलपणा असला तरी कधी कधी तुमचे वागणे सहनशक्तीच्या पलिकडे राहील. आपल्या हातून घडलेली एखादी चूक प्रांजळपणे कबूल करून तुम्ही रिकामे होणार आहात. फाजील आत्मविश्वासामुळे तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची कला नजरेत भरण्यासारखी समोर येईल. घरामध्ये स्फूर्तीदायक वातावरण निर्माण होईल. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. मनावर नियंत्रण ठेवून संयम राखावा. व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची भागीदाराची मदत घ्यावी लागेल.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

मकरः 

आज रवि चंद्र योगात समाजामध्ये पुढारीपण मिळण्याची ताकद तुमच्याकडे येईल. अविचाराने घेतलेला कोणताही निर्णय आर्थिक व्यय होण्यासाठी कारणीभूत ठरेल. परदेशगमनाचे योग येतील. तुमचा धाडसी स्वभाव उफाळून वर येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गोडी निर्माण होईल. बौद्धीक क्षेत्रात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. पाठीची दुखणी डोके वर काढतील. व्यायाम आणि औषधोपचार या दोहोंची साथ मिळेल. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न सफलदायक ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. हितशत्रु आणि विरोधकांवर मात कराल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहिल. व्यापार रोजगारात अनुकूल असा प्रतिसाद मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे.

शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०४, ०८.

कुंभः 

आजच्या चंद्र गोचरात व्यापारात विवाहेच्छूकांचे विवाह ठरतील. जोडीदार उत्तम आणि सुसंस्कृत मिळेल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तेवढाच खर्चिकपणाही वाढेल. अंधश्रद्धा ठेवण्यापेक्षा डोळसपणे एखाद्या गोष्टीचा विचार करायला लागेल. व्यवसायात सर्व कामे एकट्याने करण्यापेक्षा योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचन मनानाची गोडी वाढेल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारानिमित्त प्रवास होईल. हानी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद संभवतात. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा. प्रवासात विशेष काळजी घ्यावी लागेल.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०४, ०७.

मीनः 

आज चंद्रभ्रमण अनुकुल असल्याने जोडीदाराचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक फायदा चांगला होईल. कामाचे उत्तम नियोजन कराल. आपल्या स्वतंत्र विचाराचा अभिमान बाळगाल परंतु सर्व प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. स्थावर इस्टेटी संबंधी अचानक काही समस्या उद्भवण्याची शक्यता. व्यवहार आणि भावना या स्वतंत्र गोष्टी आहेत. स्वत:ची कामे स्वतःच केलेली बरी पडतील. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. साहित्या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. मुलांकडुन समाधान मिळेल. आत्मविश्वास वाढीस लागल्याने लाभाचा दिवस आहे.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.

WhatsApp channel