Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मीन राशीच्या लोकांचा कर्जाचा बोजा वाढू शकतो! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मीन राशीच्या लोकांचा कर्जाचा बोजा वाढू शकतो! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मीन राशीच्या लोकांचा कर्जाचा बोजा वाढू शकतो! वाचा चारही राशींचे भविष्य!

Published Mar 19, 2024 09:34 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction today 19 march 2024 : आज १९ मार्च २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल मंगळवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज दशमीचा चंद्र दर्श मंगळ शनिशी संयोग करीत असून, धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनु: 

आज चंद्राची स्थिती लक्षात घेताएक प्रकारचा उत्साह अंगी संचारेल. भाग्याची साथ चांगली मिळेल. व्यवसायात साम दाम दंड भेद या नीतीने वागून तुम्ही ठरवलेले उद्दीष्ट पूर्ण कराल. बोलण्याची हातोटी चांगली असल्यामुळे तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. घरातआणि घराबाहेर उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदारा कडून सहकार्य लाभेल. आपणास मुशाफिरीत लाभ होईल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहिल. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. कुटुंबात शुभवार्ता मिळेल.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.

मकर: 

आज चंद्रबल अनिष्ट असल्याने जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. थोडी निराशा वादी प्रवृत्ती राहील. करियरमध्ये खूप कष्ट करावे लागतील. गुप्त शत्रू डोके वर काढतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य बिघडू शकते. स्थावर इस्टेटीचे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. कोर्टकचेरीच्या कामामध्ये अडचणी वाढतील. आपण अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. जवळचे मित्र आप्तेष्ट संबंध तुटण्याची शक्यता आहे. माणसं दुरावली जातील असी वर्तणुक टाळावी. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्या कडे लक्ष दया. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. नवीन व्यापारास प्रारंभ करण्यासाठी अशुभ दिवस आहे. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सतर्क रहा. फसवणूक आर्थिक हानी संभवते. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०५, ०८.

कुंभ: 

आज ग्रहयोगामुळे आपणास पैसा मिळाला तरी त्याला अनेक वाटा फुटतील. तुमच्या कडक बोलण्यामुळे जवळच्या लोकांची मने दुखावतील.कुटुंबात मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल. विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील. तुमचा मुड कधी जाईल आणि कधी चिडाल याचा भरवसा राहणार नाही. मानसिक त्रास निर्माण होणाऱ्या घटना घडतील. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. पत्नी जोडीदाराच्या आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. सावधगिरी न बाळगता कोणतेही काम अंगावर घेऊ नका. नाहीतर कठीण प्रसंगाशी झगडावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत.

शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.

मीन: 

आज चंद्रभ्रमणात कुटुंबातील नातेवाईकांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे त्रस्त व्हाल. दुसऱ्याना काही कळू न देता जेवढ्या गुप्त गोष्टी तुम्हाला करता येतील तेवढ्या करणार आहात. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे अनेक बेत ठरवाल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी मनोधैर्य सांभाळा. अविचारीपणा योग्य नाही. विचारा अंतीच निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. शांत चित्त ठेवणाचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उताविळ पणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षाणिक फायद्या साठी गुंतवणुक करू नका. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा.

शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.

Whats_app_banner