आज दुर्गाष्टमीचा चंद्र बुधाच्या राशीतुन आणि मंगळाच्या नक्षत्रातुन संक्रमण करत आहे. आयुष्मान योग असुन मंगळ,शुक्र आणि शनिशी संयोग करीत आहे. दिनमाना वर मंगळाचा विशेष प्रभाव राहील! कसा असेल आज सुट्टीचा दिवस! पाहुयात राशीनुसार! वाचा राशीभविष्य!
धनु: आज अनुकूल ग्रह युतीत सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल. आणि कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. परंतु त्यामुळे आपले मनःस्वास्थ्य मात्र हरवून बसाल. अशावेळी नको ते धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे.
कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा.कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल.कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल.
शुभ रंगः पिवळा शुभ दिशाः ईशान्य.
शुभ अंकः ०३, ०७.
मकरः आज चंद्राशी होणारा शुभ ग्रहांचा संयोग पाहता राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. पार्टनरशिपच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत पण तुमच्या मुडी स्वभावामुळे प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. परदेशगमनाचा अथवा दुरचे प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल. निरनिराळ्या सूचना कल्पना व्यावसायिक दृष्ट्या अमलात आणाल.
शुभ रंगः निळा शुभ दिशाः नैऋत्य.
शुभ अंकः ०४, ०८.
कुंभः आज प्रतिकूल ग्रहयुतीमुळे दुर्मिळ गोष्टींचा संग्रह कराल. झोपेची तक्रार राहील. व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. दुसरे काय म्हणतात यापेक्षा तुमचे अंतर्मन तुम्हाला काय सांगते याचा विचार करावा. काम करण्यासाठी बुद्धीबरोबर चिकाटीही हवी शक्ती आणि युक्तीचा सुरेख संगम व्यवहारात दिसेल. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. परंतु वेळीच सर्व गोष्टी उघड बोलून वातावरण थंड कराल. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. फाजिल आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याची दक्षता घ्या. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. कामचुकारपणा करू नका. शक्यतो प्रवास टाळा.
शुभ रंगः जांभळा शुभदिशाः पश्चिम.
शुभ अंकः ०२, ०७.
मीन: आज चंद्रगोचरात जुनी येणी वसूल होतील. कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम रहाणार आहात. घरात वेळ देऊ शकणार नसल्यामुळे मनावर थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा कुटुंबातील अचानक अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा.
व्यवसायातील वातावरण चांगले राहिल अचानक लाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदन मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. दुसर्याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभरटीचा दिवस आहे. एखादया विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. पत्नीकडून सासरच्या मंडळीकडून सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्प कामे पुर्णात्वास जातील.
शुभ रंग: पिवळसर शुभ दिशाः ईशान्य.
शुभ अंकः ०३, ०५.