Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज चंद्रदेव मंगळ,शुक्र आणि शनि या तिन ग्रहांबरोबर नवमपंचम योगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!
आज चंद्र-शुक्राशी संयोग करीत आहे. व्यापारात जादा कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम स्वीकाराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. विवाह जुळतील.भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल. भावंडाची योग्य साथ मिळेल. आपल्या समोर नवीन व्यवसायाचा प्रस्ताव येतील. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नविन संधी आपल्याला मिळणार आहे. सौभाग्य योगात वृद्धी होईल. आर्थिक बाबती मधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल.
शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०४, ०७.
आज चंद्र सुर्याच्या नक्षत्रातुन गोचर करणार असून संयोगात अनपेक्षित फळे मिळण्याची शक्यता आहे. चंद्रभ्रमण हे अशुभ स्थानातून होत आहे. उद्योग व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळा. अडचणी येऊ शकतात. कामांना गती येईल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कुंटुंबातील वरिष्ठ मंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष दया. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी.
शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.
आज शनि-चंद्र योगात हा कलह उत्पन्न होणारा योग आहे. देवाण घेवाणीपूर्वी कागदपत्रे वाचा. वाद घालू नका. निजी जीवनात मोठ्या निर्णयात कुटुंबाचे समर्थन प्राप्त होणार नाही. घरातील व्यक्तींशी क्षुल्लक कारणावरून हुञ्जत घालू नका. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. घरात तुमचे धोरण सबुरीचे ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड पणा राहिल. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्भवतील. कुटुंबापासुन दुर जाल. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. मित्रमैत्रिण नातेवाईकांसोबत सलोख्याने वागा. प्रकृती वर लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील.
शुभरंग: जांभळा, शुभदिशाः नेॠत्य, शुभअंकः ०७, ०८.
आज शुक्र-चंद्र योगात घरात मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. व्यवसायात कुणी नवीन भागीदार जोडण्याचा विचार कराल. जादा भांडवलाची गरज वाटेल. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस प्रकाशन साहित्यिक यांच्या करिता आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी रहिल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील.
शुभरंग: पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.
संबंधित बातम्या