मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : कुंभ राशीच्या लोकांनी संधीचं सोनं करा! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : कुंभ राशीच्या लोकांनी संधीचं सोनं करा! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 14, 2024 11:35 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction today 14 march 2024 : आज १४ मार्च २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल गुरुवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ, मीन
धनु, मकर, कुंभ, मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज रविचा मीन राशीतील प्रवेश आणी वैधृती योगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनुः 

आज रवि राशीबदलात आत्मविश्वास द्विगुणित होईल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. गैरसमज वितंडवादाची गाठोडी मागे टाकून पुढे जाल तर सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीं सोबत परिचय होईल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. मनोवांच्छित फळ मिळणार आहे. परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

मकरः 

आज चंद्र शुक्राशी शुभ योग करत आहे. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम ठसा निर्माण करण्यास तुम्ही वरचढ ठरणार आहात. नवीन प्रकल्पात गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहिल. तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. निरनिराळ्या सुचणार्‍या कल्पना आमलात आणा. परदेशगमनाचा योग आहे. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. व्यवसायात कोणत्याही मोहात न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या. महत्वपूर्ण कागदपत्रे मात्र संभाळा. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०४, ०८.

कुंभः 

आज शुक्र-चंद्र चंद्र योगात नवीन जबाबदारी मिळेल. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. नोकरदार बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारा कडून अपेक्षित सहकार्य लाभेल. घरगुती सुविधेत वाढ होईल. वरिष्ठाची मदत मिळेल. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नवीन कल्पना आमलात आणा. संधीचं सोनं करा. विचलीत होऊ नका. शासकीय कामात यश प्राप्त होईल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद अधिकच दुणावेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. ज्या कार्याचा निश्चय कराल ती गोष्ट पार पडेपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. व्यापारी वर्गाकरीता महत्वाचा योग आहे. आज उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०५, ०८.

मीनः 

आज चंद्रबल अनिष्ट असल्याने प्रकृतीवर विपरित परिणाम होऊ शकतात. कलाकारांना कला क्षेत्रात वाव मिळेल पण त्यापासून आर्थिक लाभ मात्र मिळणार नाही. योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे आज टाळा. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. स्वप्नांचा संबंध मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. प्रेमप्रकरणात गैरसमज त्रासदायक ठरतील. उद्योग व्यवसायातही काहीसा ताणतणाव राहील.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.

WhatsApp channel