Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मकर राशीच्या लोकांना प्रवास सुखकर ठरेल! वाचा चारही राशींचे भविष्य!-dhanu makar kumbh meen rashi today 12 march 2024 sagittarius capricorn aquarius pisces zodiac signs prediction ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मकर राशीच्या लोकांना प्रवास सुखकर ठरेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मकर राशीच्या लोकांना प्रवास सुखकर ठरेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mar 12, 2024 11:05 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction today 12 march 2024 : आज १२ मार्च २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल मंगळवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : आज चंद्र मीन राशीत भ्रमण करीत आहेत. शुक्ल आणि ब्रह्मा योगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनु: 

आज बुध-चंद्र संयोग पाहता परदेशात नोकरीच्या संधी चालून येतील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत. नकारात्मक विचार मात्र दूर ठेवा. रिअल इस्टेट जमीन जागा खरेदी विक्री करिता आजचा दिवस फायदेशीर ठरेल. महत्त्वपूर्ण निर्णय हे गुप्त ठेवा. व्यापारात आर्थिक दृष्ट्या प्रलंबित असणारी कामे पूर्णत्वास जातील. प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होईल. पदप्राप्ती मानसन्मान मिळेल. पत्नीकडून सहकार्य आणि कुटुंबातील इतरां कडून प्रोत्साहन मिळेल. उर्जात्मक आणि उत्साही दिवस आहे. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.

मकरः 

आज आज चंद्राची स्थिती लक्षात घेता कार्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राही त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक स्पर्धेत यश मिळण्याची आज संधी आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. आर्थिक आवक वाढेल. आज आपल्या कामात उत्साह वाटणार आहे. बुद्धीचा वापर करुन पैशाची गुंतवणूक करा. उद्योग व्यवसायात विचार पुर्वक केलेली मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. प्रवास सुखकर व हितकारक ठरतील. सामाजिक मान सन्मान मिळेल.

शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०४, ०८.

कुंभ: 

आज चंद्रगोचर पाहता व्यक्तिगत समस्याचा प्रभाव कामावर राहिल. एखादी घटना अचानक घडण्याकडे परिस्थितीचा कल राहील. अशा चांगल्या वाईट घटना जास्त मनावर घेतल्या तर मनावरचा ताण वाढेल. शेअर्समधील गुंतवणूक नुकसानकारक होईल. काही अप्रिय घटनेमुळे त्रास सहन करावा लागेल. आर्थिक व्यवहारात सावधानी बळा. नोकरीत दुसऱ्यावर रोष करू नका. वाईट संगती पासुन सावध रहा. घरातील मौल्यवान वस्तु गहाळ किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. व्यवसाय रोजगारात मोठे परिवर्तन घडून देण्याची संभावनाआहे. आपले निर्णय चुकीचे ठरू शकतात. व्यसनी मित्रामुळे नुकसान होईल. व्यसना पासुन दुर रहा. मोठी आर्थिक गुंतवणुक करू नका. कर्ज घेणे देणे टाळा. आर्थिक नुकसान हानी संभवते. छोट्या छोट्या बाबींकडे लक्ष दया.

शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०४, ०८.

मीन: 

आज प्रतिकूल चंद्रभ्रमणात रोजगारातील परिस्थिती सामान्य राहणार आहे. घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. परंतु तुमच्या समतोल स्वभावानुसार परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल. मितभाषी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. तरूण तरुणीचे विवाह योग जुळतील. प्रेमप्रकरणात कुटुंबाच्या विरोधात जावून कठोर निर्णय घ्यावे लागतील. प्रिय व्यक्तीबरोबर अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. आपल्या संशयीवृत्तीवर आवर घाला. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायातील चिंतेमुळे मन उदास राहील. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. कलाकारांना काही नवीन संधी मिळतील.महिला वर्गाचा आदर राखा. पती-पत्नीत वाद होणार नाही याची काळजी घ्या.

शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

Whats_app_banner