मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मकर राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक सौख्याचा दिवस! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar kumbh Meen Rashi Today : मकर राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक सौख्याचा दिवस! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 01, 2024 11:01 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction today 1 march 2024 : आज १ मार्च २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces
Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya Today : चंद्र रवि आणि शनिशी नवमपंचम योग करीत असल्याने विषयोग आणि केमद्रुम योग देखील घटीत होत आहेत. धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनुः 

आज चंद्रबल लाभणारं असल्याने मानसिक स्वास्थ उत्तम राहील. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. धार्मिक वृत्ती राहील. काही लाभदायक गोष्टीही घडतील. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवाल. आत्मविश्वासही वाढेल. घरामध्ये मंगलकार्य ठरतील. रोजगारात समाधानकारक स्थिती राहील. व्यवसायात वाढ होईल मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्र किवा सहकारी यांच्याकडून मदत मिळेल. मनामध्ये उर्जा व आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. संततीच्या महत्वाच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. घरातील अडचणी दूर होतील.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.

मकरः 

आज चंद्रभ्रमण आणि ग्रहयोग अनुकुल दिवसभर मन प्रसन्न राहिल. नोकरीतील बदल फायदेशीर ठरणार आहे. लेखनाचा नवा बाज निर्माण करता येईल. बऱ्याच जणांना प्रसिद्धीच्या झोतात येण्याची संधी मिळेल. तुमच्या अंगच्या गुणाना वाव मिळेल. आपली प्रतिभा उंचावेल. दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल. नोकरीत कामाच्या ठिकाणी आपली प्रशंसा कौतुक केले जाईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्या साठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य मिळाल्याने उत्साह वाढणार आहे.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०२, ०८.

कुंभः 

आज ग्रहयोग प्रतिकुल आहेत. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. प्रचंड बुद्धीमत्ता असूनही स्वतःचे प्रश्न सोडवताना मनाचा गोंधळ उडेल. काही घरगुती गोष्टींमुळे अस्वस्थता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे थोडा ताण राहील. व्यवसायात मात्र स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. नैराश्यामुळे चिडचिड निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चिंताही वाढेल. रोजगारात जबाबदारी नुसार काम करा. मनात अशांती असल्या कारणाने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंदयात काही व्यवहार अनपेक्षित नुकसान कारक ठरतील. अल्प फायदा पाहून अविचारी गुंतवणूक करू नका. विचार पूर्वक निर्णय घ्या. प्रकृती आस्थिर व बैचेन राहील. आर्थिक नुकसान फसवणुक होण्याची शक्यता आहे.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०४, ०८.

मीनः 

आज चंद्र भ्रमणात आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. थोडीशी चैन आणि खरेदीचा मोह होईल. घरातील काही गोष्टींसाठी पैसाही खर्च कराल. समजुतदारपणाचे धोरण स्वीकारावे लागेल. कलाकारांना चांगल्या संधी मिळून त्यांच्या कलेचे चीज होईल. संकल्प पूर्ण करण्याकरिता तुमचा भागीदार व वैवाहिक जोडीदार या दोघांची उत्तम साथ मिळणार आहे. आपला स्वभाव फार उदारमतवादी राहील. आपल्या चैनी स्वभावावर आळा घालावा लागेल. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्र नातेवाईक आप्तेष्टा कडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.

WhatsApp channel