Dhanu Makar Kumbh Meen Horoscope: आज चंद्र मीन राशीत संक्रमण करत आहे. त्यासोबतच जोतिषशास्त्रात चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. या चतुर्ग्रही योगाचा परिणाम धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीवर प्रभावी ठरणार आहे.या राशींना कमी अधिक प्रमाणात फायदाच होणार आहे. पाहूया या चार राशींचे आजचे राशिभविष्य काय सांगते.
आज धनु राशीवर चंद्र ग्रहाची कृपा राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक सुख मिळेल. देवावर आणखी जास्त विश्वास निर्माण होईल. त्यातूनच धार्मिक ठिकाणी प्रवासाचा योग जुळून येईल. वडिलोपार्जित संपत्तीतून, वारसा हक्कातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल. तुमच्या गुपित कलागुणांना वाव मिळेल. चांगल्या कामामुळे पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. लेखक लोकांचे लेखन प्रकाशित होईल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. अचानक धनलाभ झाल्याने घरामध्ये आनंदी वातावरण असेल.
शुभ रंग: पिवळा
शुभ दिशा: ईशान्य
शुभ अंकः ०७, ०९
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रतिकूल असणार आहे. त्यामुळे फारशा आनंददायी घटना घडणार नाहीत. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता. आहे. अचानक आर्थिक गुंतवणूक कराल. कामाचे सर्व व्याप सांभाळून धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. जुन्या मित्रांमध्ये मन गुंतवाल. मित्रांसोबत वेळ उत्तम जाईल. जुन्या आठवणीत रमाल. भांडण वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल.सतत मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. आशावादी दृष्टीकोनातून सतत विचार करावा. रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शुभ रंग: जांभळा
शुभ दिशा: नैऋत्य
शुभ अंकः ०५, ०९
कुंभ राशीतील लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असेल. तसेच व्यापारात मोठा फायदा करणारा दिवस आहे. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना राजाश्रय लाभेल. अचानक मानधनात वाढ होईल. संशोधन क्षेत्रातील मंडळीना मानसन्मान तसेच पदवी पुरस्कार मिळेल. व्यवसायात आर्थिक गुंतवणूक मोठया प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. तुमच्या मनाप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणीमधील वादविवाद संपुष्टात येतील. नातेसंबंधात सुधारणा होईल. दिवस उत्साहात पार पडेल.
शुभ रंग: निळा
शुभ दिशा: पश्चिम
शुभ अंकः ०१, ०८.
मीन राशीसाठीसुद्धा आजचा दिवस उत्तम असेल. समाजातील तुमची प्रतिमा आणखी उंचावेल. मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात कराल. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. व्यवसायात चांगला विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. अचानक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेमंद सिद्ध होईल.कलाकार व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. तुमच्या कलागुणांना योग्य न्याय मिळेल.
शुभ रंग: पिवळा
शुभ दिशा: ईशान्य
शुभ अंकः ०३, ०७
संबंधित बातम्या