Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 4 June 2024 : जोतिष शास्त्रानुसार आज बुध आणि सूर्याची युती होऊन बुधादित्य योग घटित होत आहे. शिवाय शुक्र आणि बुधच्या संयोगातून कलायोगाची निर्मिती होत आहे. या दोन विशेष योगांचा परिणाम धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीवर कसा होणार याबाबत जाणून घेऊया.
धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. काळाच्या पुढे जाऊन विचार कराल. कोणत्याही गोष्टीसाठी पराक्रमाची शर्थ कराल. एकंदरीत यशाकडेच वाटचाल राहणार आहे. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्यपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. परदेशवारी होण्याची शक्यता आहे.
शुभरंग: पिवळसर शुभदिशा: ईशान्य.शुभअंकः ०३, ०६.
मकर राशीच्या लोकांसाठी संमिश्र दिवस असणार आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. तुम्हाला मेहनतीनुसार चांगल्या फळांची प्राप्ती होईल. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक आयुष्य अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. सहकाऱ्यांसोबतचे वाढविवाद मात्र टाळावे.
शुभरंगः निळा शुभदिशाः नैऋत्य.शुभअंकः ०४, ०८.
तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. गैरसमज, वितंडवादा मागे टाकून पुढे जाल तर च सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. तुमच्या वागणुकीमुळे आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसतील. तुमच्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहिल.
शुभरंग: जांभळा शुभदिशा: पश्चिम.शुभअंकः ०६, ०८.
मीन राशीच्या लोकांसाठी आज दूरच्या प्रवासाचे योग येतील. ज्यांचे परदेशात व्यवहार आहेत त्यांना तिकडून चांगले संकेत मिळतील. त्यामुळे छोटी ट्रीप करावीशी वाटेल. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी आणि सुखद राहील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांसाठी शुभदिवस आहे. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील.
शुभरंग: पिवळा शुभदिशा: ईशान्य.शुभअंकः ०३, ०६.
संबंधित बातम्या