मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya: मीन राशीच्या लोकांना प्रेमात येणार अडथळा! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya: मीन राशीच्या लोकांना प्रेमात येणार अडथळा! वाचा चारही राशींचे भविष्य

May 18, 2024 10:51 AM IST

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya: आज मंगळ आणि चंद्रामध्ये समसप्तक योग जुळून येणार आहे. तर दुसरीकडे चंद्राचे संक्रमण कन्या राशीच्या उत्तराफाल्गुनी नक्षत्रात दिसून येणार आहे.

मीन राशीच्या लोकांना प्रेमात येणार अडथळा! वाचा चारही राशींचे भविष्य
मीन राशीच्या लोकांना प्रेमात येणार अडथळा! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya: जोतिषशास्त्रानुसार आज शनिवार, १८ मे २०२४ रोजी मंगळ आणि चंद्रामध्ये समसप्तक योग जुळून येणार आहे. तर दुसरीकडे चंद्राचे संक्रमण कन्या राशीच्या उत्तराफाल्गुनी नक्षत्रात दिसून येणार आहे. या सर्व हालचालींमध्ये धनु, मकर,कुंभ आणि मीन राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार हे जाणून घेऊया.

धनु

धनु राशीच्या लोकांनी स्वप्नांचा संबंध वास्तवाशी लावण्याचा प्रयत्न करू नये. कामाच्या दृष्टीकोनातून आजचा त्रासदायक असणार आहे. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगारात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आज वणिज करणात करियरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कलाकारांना कला क्षेत्रात वाव मिळेल पण त्यापासून आर्थिक लाभ मात्र मिळणार नाही. योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील.

शुभ रंग: पिवळा

शुभ दिशा: ईशान्य

शुभ अंकः ०३, ०६.

Mesh Vrishabh Mithun Kark Rashi Bhavishya: वृषभ राशीवर दिसणार हर्षण योगाचा प्रभाव! वाचा चारही राशींचे भविष्य

मकर

आज व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देवाणघेवाणीच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. मनावर फार ताण घेऊ नका. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची मध्यस्थी घ्यावी लागेल. आपल्या स्वभावात चंचलता निर्माण होईल. आज चंद्राशी होणारा योग पाहता थोडेसे धूर्त संयमितपणा बरोबरच धोरणी रहाल. मनात काही योजना असतील तर त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा. हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. बौद्धीक क्षेत्रात काम करणारांना चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा निष्काळजीपणा राहील. हातात घेतलेल्या कार्यात प्रतिकुल परिणाम येण्याची शक्यता आहे.

शुभ रंगः निळा

शुभ दिशाः नैऋत्य

शुभ अंकः ०४, ०८.

Sinh Kanya Tula Vrishchik Rashi Bhavishya: कन्या राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतील! वाचा चारही राशींचे भविष्य

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आज प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी आणि मुलांसोबत संबंध चांगले राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर असणाऱ्यांना शुभदिवस आहे. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील. तसेच आज चंद्राचा केतुशी संयोग होत आहे. नोकरी व्यवसायात मनासारख्या घडणाऱ्या गोष्टींमुळे मन आनंदी राहील. सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. ज्यांचे परदेशात व्यवहार आहेत त्यांना तेथून चांगले संकेत मिळाल्यामुळे छोटी ट्रीप करावीशी वाटेल. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नका.

शुभ रंग: जांभळा

शुभ दिशा: पश्चिम

शुभ अंकः ०६, ०८.

Today Horoscope 18 May 2024 : मेष राशीसाठी चंद्र संक्रमण ठरणार शुभ! वाचा आजचे राशीभविष्य

मीन

तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारीवर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी लागेल. कौटुंबिक आयुष्य अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. सहकाऱ्यांसोबतचे वाढविवाद मात्र टाळावेत.आज चंद्रबल उत्तम असल्याने लोकांना संघटित करण्याबाबत विशेष रूची ठेवाल. राजकारणी लोकांना आपल्या कामामध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे जाण्याची वृत्ती ठेवावी लागेल. प्रेमवीरांना प्रेमप्रकरणात अडथळे संभवतात. कोणत्याही निर्णयात ठामपणा नसल्यामुळे कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या गोष्टी साध्य होतील.

शुभ रंगः पिवळा

शुभ दिशाः ईशान्य

शुभ अंकः ०६, ०९.

WhatsApp channel