मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : धनु राशीला जोडीदाराच्या दुहेरी वागण्याचा त्रास होणार! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : धनु राशीला जोडीदाराच्या दुहेरी वागण्याचा त्रास होणार! वाचा चारही राशींचे भविष्य

Jun 14, 2024 10:20 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 14 June 2024 : आज (१४ जून) शुक्रवारचा दिवस धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा जाणार राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : धनु राशीला जोडीदाराच्या दुहेरी वागण्याचा त्रास होणार! वाचा चारही राशींचे भविष्य
Dhanu Makar Kumbh Meen Rashi : धनु राशीला जोडीदाराच्या दुहेरी वागण्याचा त्रास होणार! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आजचा दिवस आपल्याला कसा जाणार? लव्ह लाईफमध्ये काय बदल होणार? वैवाहिक आयुष्यात काय होणार? करिअर-व्यवसायात फायदा होणार की तोटा? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. दैनंदिन राशीभविष्य आपल्या या प्रश्नांची उत्तरे देत असते. त्यामुळेच बहुतांश लोक राशीभविष्य पाहून आपल्या दिवसाची सुरुवात करत असतात. त्यानुसार आज शुक्रवारचा दिवस धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा जाणार ते पाहूया.

धनु

आज संततीसोबत मतभेद झाल्याने दोन पिढ्यांमधील संघर्ष अनुभवाल. इथे मनाचा मोठेपणा दाखवून सुवर्णमध्य काढावा लागेल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक प्रगती करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्यही जपा. व्यवसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. इतरांशी तुमचे विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम.शुभअंकः ०५, ०८.

मकर

वैवाहिक आयुष्यात एकमेकांना समजून घ्याल. त्यामुळे थोडी मनःशांती मिळेल. व्यवहारात नवनवीन गोष्टींचे जरा जास्तच आकर्षण राहील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित यश संपादन करता येईल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. परंतु दुसऱ्यांना मदत करताना सावधगिरी बाळगा. अर्थिक व्यवहार करताना पैसे गुंतवताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. संततीकडून सर्वदृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील.

शुभरंग: जांभळा शुभदिशा: नैऋत्य.शुभअंकः ०१, ०८.

कुंभ

अती संवेदनशील स्वभावामुळे प्रत्येक गोष्टीचा उगाचच विचार करीत रहाल. आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहील. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना काळ अनुकूलच आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. सरकारी संदर्भातील व्यक्तींनादेखील बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदारासोबत, कुटुंबातील सदस्यांसोबत नातेसंबंध एकंदरीत समाधानी राहील. गायन कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहे. आपले आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहणार आहे.

शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम.शुभअंकः ०५, ०८.

मीन

व्यवसायात गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी खास योजना आखाल. वरिष्ठांची मर्जी झाल्यामुळे प्रमोशनही मिळू शकते. रहाणीमान उंचावण्यासाठी बराच पैसा खर्ची टाकाल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. सार्वजनिक कार्यात पदप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. मेहनत वाढवावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. त्याच बरोबर वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य.शुभअंकः ०१, ०९.

WhatsApp channel