Dhanu makar kumbh meen: त्रिग्रही योगात धनु राशीच्या लोकांना प्रेमात होणार कुटुंबीयांचा विरोध! वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu makar kumbh meen: त्रिग्रही योगात धनु राशीच्या लोकांना प्रेमात होणार कुटुंबीयांचा विरोध! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu makar kumbh meen: त्रिग्रही योगात धनु राशीच्या लोकांना प्रेमात होणार कुटुंबीयांचा विरोध! वाचा चारही राशींचे भविष्य

Jun 01, 2024 09:07 AM IST

Dhanu makar kumbh meen rashi bhavishya : चंद्रभ्रमणामुळे आज चंद्राचा मंगळ आणि राहूसोबत संयोग होऊन त्रिग्रही योग जुळून येत आहे.

Dhanu Makar Kumbh Meen
Dhanu Makar Kumbh Meen

Dhanu makar kumbh meen rashi bhavishya: आज १ जून २०२४ रोजी रोजी चंद्रभ्रमणामुळे चंद्राचा मंगळ आणि राहूसोबत संयोग होऊन त्रिग्रही योग जुळून येत आहे. शिवाय मंगळ आज राशीपरिवर्तन करत मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे रुचक योग निर्माण होत आहे. या सर्व हालचालींमध्ये आजचा दिवस धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा जाणार ते पाहूया.

 

धनु

धनु राशींसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे.  मितभाषी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. तरुणांचे विवाह योग जुळतील. प्रेमप्रकरणात कुटुंबाच्या विरोधात जावून कठोर निर्णय घ्यावे लागतील. जवळच्या व्यक्तींसोबत वादविवाद करणे टाळा. तुमच्या संशयीवृत्तीवर आवर घाला. अथवा नात्यात दुरावा येऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायातील चिंतेमुळे मन उदास राहील. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. कलाकारांना काही नवीन संधी मिळतील.महिला वर्गाचा आदर राखा. पती-पत्नीत वाद होणार नाही याची काळजी घ्या. 

शुभ रंगः पिवळसर 

शुभ दिशाः ईशान्य

शुभ अंकः ०३, ०७.

Sinh Kanya Tula Vrishchik: वृश्चिक राशींच्या लोकांना मिळणार कलाक्षेत्रात झळकण्याची संधी! वाचा चारही राशींचे भविष्य

मकर

आज तुम्ही कामात कितीही व्यग्र असला तरी जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. त्यामुळे नात्यातील गोडवा अधिक वाढेल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. आज भाग्याची उत्तम साथ मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक स्पर्धेत यश मिळवण्यासाठी आज संधी आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. आर्थिक आवक वाढेल. मनासारख्या गोष्टी घडत असल्याने आज तुम्हाला कामात उत्साह वाटेल. बुद्धीचा वापर करुन पैशाची गुंतवणूक करा. उद्योग व्यवसायात विचारपूर्वक केलेली मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. प्रवास सुखकर आणि हितकारक ठरतील. सामाजिक मान सन्मान मिळेल.

शुभ रंगः जांभळा 

शुभ दिशाः पश्चिम

शुभ अंकः ०४, ०८.

Panchang पंचांग १ जून २०२४ शनिवार : तिथी, शुभ मुहूर्त, योग, नक्षत्र, करण आणि राहुकाळ जाणून घ्या

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. चांगल्या वाईट घटना जास्त मनावर घेतल्या तर मनावरचा ताण वाढेल. शेअर्समधील गुंतवणूक नुकसानकारक होईल. मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींमुळे त्रास सहन करावा लागेल. आर्थिक व्यवहारात सावधानी बाळगा. नोकरीत दुसऱ्यावर रोष करू नका. वाईट संगतीपासून सावध रहा. घरातील मौल्यवान वस्तु गहाळ किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. व्यवसाय रोजगारात मोठे परिवर्तन घडून येण्याची संभावनाआहे. आपले निर्णय चुकीचे ठरू शकतात. व्यसनी मित्रामुळे नुकसान होईल. व्यसनापासुन दुर रहा. मोठी आर्थिक गुंतवणुक करू नका. कर्ज घेणे किंवा देणे टाळा. आर्थिक नुकसान हानी संभवते. छोट्या छोट्या बाबींकडे लक्ष दया.

शुभ रंगः निळा 

शुभ दिशाः नैऋत्य

शुभ अंकः ०४, ०८.

 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत. नकारात्मक विचार मात्र दूर ठेवा. रिअल इस्टेट, जमीन, एखादी जागा खरेदी विक्री करिता आजचा दिवस फायदेशीर ठरेल. महत्त्वपूर्ण निर्णय हे गुप्त ठेवा. व्यापारात आर्थिकदृष्ट्या प्रलंबित असणारी कामे पूर्णत्वास जातील. प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होईल. पदप्राप्ती मानसन्मान मिळेल. पत्नीकडून सहकार्य आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून प्रोत्साहन मिळेल. उर्जात्मक आणि उत्साही दिवस आहे. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल.

शुभ रंगः पिवळा 

शुभ दिशाः ईशान्य

शुभ अंकः ०६, ०९.

Whats_app_banner