Dhanu Makar Kumbh Meen Rashi : मकर राशीच्या लोकांचे घराचे स्वप्न होणार साकार! वाचा चारही राशींचे राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : मकर राशीच्या लोकांचे घराचे स्वप्न होणार साकार! वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : मकर राशीच्या लोकांचे घराचे स्वप्न होणार साकार! वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

May 09, 2024 10:11 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 9 May 2024 : आज ९ मे २०२४ रोजी, आज ग्रहांच्या हालचालींमुळे शशी योग, शोभन योग आणि कृतिका नक्षत्राचा प्रभावसुद्धा राशींवर दिसून येत आहे. धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल बुधवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

Dhanu Makar Kumbh Meen
Dhanu Makar Kumbh Meen

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : जोतिषशास्त्रानुसार आज ग्रह-नक्षत्रांचे विविध योग तयार होत आहेत. आज सूर्य आणि शुक्राने मेष राशीमध्ये संक्रमण केले आहे. या दोघांचा संयोग प्रभावी ठरु शकतो. तर दुसरीकडे चंद्र आणि गुरु वृषभ राशीत विराजमान आहेत. त्यांच्या संयोगाने गजकेसरी योग्य घटित होत आहे. सोबतच आज शशी योग, शोभन योग आणि कृतिका नक्षत्राचा प्रभावसुद्धा दिसून येत आहे. आज या सर्व घडामोडींचा धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीवर काय प्रभाव पडणार आहे ते जाणून घेऊया.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आरोग्य उत्तम राहील त्यामुळे तुमचा उत्साहही वाढेल. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. तुमच्याकडे प्रचंड बुद्धीमत्ता असूनही स्वतःचे प्रश्न सोडवताना मनाचा गोंधळ उडेल. काही घरगुती गोष्टींमुळे अस्वस्थता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे थोडा ताण राहील. व्यवसायात मात्र स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. तरुणांना प्रेम आणि कर्तव्य यामध्ये पेचात टाकणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्याची इच्छा होऊ शकते. सुप्त कलागुणांना वाव द्याल.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य.शुभअंकः ०१, ०९.

मकर

आज गुरुवारचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल असणार आहे. दिवसभर स्वभाव मन मिळावू राहील. नवीन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. प्रबळ आत्मविश्वास आणि परिस्थितीचा अचूक अंदाज तुमच्या कामाचा दर्जा सुधारण्यास मदत करेल. आरामदायी आयुष्य जगावेसे वाटेल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल. विवाहासाठी इच्छुक असणाऱ्यांना आपला साथीदार निवडण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहणार आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल अथवा कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. घरामध्ये आई वडिलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवाल.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य.शुभअंकः ०१, ०८.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. कामामध्ये अतोनात मेहनत करावी लागेल. अचानक आलेल्या अडचणींचा सामना धैर्याने केल्यास मनस्ताप होणार नाही. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या अत्यंत सौम्य व शांत स्वभावाचा फायदा कोणी घेत नाही ना याकडे लक्ष द्या. घरामध्ये कोणाच्याही आजारपणासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. संततीच्या बाबतीत दोन पिढ्यांमधील संघर्ष अनुभवाल. इथे तुम्हाला सुवर्णमध्य काढावा लागेल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. लव लाईफ सुरळीत ठेवण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलावे लागेल.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम.शुभअंकः ०५, ०८.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. हातात पैसा आल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी होत असलेल्या राजकारणापासून स्वतःला दूर ठेवा. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना व्यवसायात कोणत्या गोष्टी केल्या असता आपली प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करावा लागेल. . वैवाहिक आयुष्यात एकमेकांना समजून घ्यावे लागेल. त्यामुळे मनाला थोडी शांतता मिळेल. अर्थिक व्यवहारात गुंतवणूक करताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. संततीकडून सर्वदृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. आरोग्याची काळजी घेत भोजनात बदल करावे लागतील.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य.शुभअंकः ०३, ०५.

Whats_app_banner