मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : आज धनु राशीच्या लोकांचा खर्च वाढणार! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : आज धनु राशीच्या लोकांचा खर्च वाढणार! वाचा चारही राशींचे भविष्य

Jun 09, 2024 10:18 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 9 June 2024 : धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल रविवारचा दिवस? वाचा चारही राशींचे भविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : चंद्र मिथुन आणि कर्क राशीतुन व पुनर्वसु नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. योग-संयोगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा रविवारचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनु

आज महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावेत. विनाकारण टाळल्यास नुकसान होईल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील. कामाच्या ठिकाणी अनेक सुधारणा कराल त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल परंतु हातात पैसे मिळायला थोडा वेळ लागेल. यशाचा आनंद मिळणार आहे. तुमच्या इच्छाआकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. जोडीदाराचा सल्ला त्यांचे वर्चस्व मान्य करावे लागेल. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०१, ०९.

मकर

धंद्यातील कामे अंतिम टप्प्यावर जाऊन पोहोचतील. प्रसिद्धीचे योग येतील. कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी निर्माण होतील. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल. तुम्हाला कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.

कुंभ

व्यवसायात गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी खास योजना आखाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळल्यामुळे प्रमोशनही मिळू शकते. रहाणीमान उंचावण्यासाठी बराच पैसा खर्ची टाकाल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. सार्वजनिक कार्यात पदप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. युवकांसाठी काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागणार आहे. जबाबदारीने काम करा. त्याच बरोबर वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०१, ०८.

मीन

आज यश मिळवण्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील. व्यवसाय नोकरीत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. मोठ्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताणतणात्मक राहिल. उद्योग धंदयात लक्ष कमी होईल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. व्यापारात सामंजस्यपणाची भूमिका घ्यावी. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.

WhatsApp channel