मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar kumbh Meen Rashi : खर्चाने मन व्यथित होईल, काळजी घ्या! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar kumbh Meen Rashi : खर्चाने मन व्यथित होईल, काळजी घ्या! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 09, 2024 11:08 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 9 April 2024 : आज ९ एप्रिल २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल मंगळवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ, मीन
धनु, मकर, कुंभ, मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज चंद्र बुधाशी संयोग करीत असुन किस्तुघ्न करणात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल नववर्षातील पहिला दिवस! वाचा राशीभविष्य!

धनु: 

आज चंद्रबल अनिष्ट असल्याने जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. थोडी निराशा वादी प्रवृत्ती राहील. करियरमध्ये खूप कष्ट करावे लागतील. गुप्त शत्रू डोके वर काढतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य बिघडू शकते. स्थावर इस्टेटीचे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. कोर्टकचेरीच्या कामामध्ये अडचणी वाढतील. आपण अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. जवळचे मित्र आप्तेष्ट संबंध तुटण्याची शक्यता आहे. माणसं दुरावली जातील असी वर्तणुक टाळावी. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्या कडे लक्ष दया. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. नवीन व्यापारास प्रारंभ करण्यासाठी अशुभ दिवस आहे. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सतर्क रहा. फसवणूक आर्थिक हानी संभवते. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वैद्यकीय बाबीवर खर्च होईल.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०५, ०७.

मकर: 

आज चंद्राशी होणारा बुधाचा योग पाहता आपणास पैसा मिळाला तरी त्याला अनेक वाटा फुटतील. कुटुंबात मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल. विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील. तुमचा मुड कधी जाईल आणि कधी चिडाल याचा भरवसा राहणार नाही. मानसिक त्रास निर्माण होणाऱ्या घटना घडतील. मनात उदासिनता वाढेल. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. पत्नी जोडीदाराच्या आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. सावधगिरी न बाळगता कोणतेही काम अंगावर घेऊ नका. नाहीतर कठीण प्रसंगाशी झगडावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत.

शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०१, ०९.

कुंभ: 

आज चंद्र बुध संयोगात मुलाच्या भन्नाट कल्पनां मुळे चक्रावून जाल. कुटुंबातील नातेवाईकांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे त्रस्त व्हाल. दुसऱ्याना काही कळू न देता जेवढ्या गुप्त गोष्टी तुम्हाला करता येतील तेवढ्या करणार आहात. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे अनेक बेत ठरवाल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी मनोधैर्य सांभाळा. अविचारीपणा योग्य नाही. विचारा अंतीच निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. शांत चित्त ठेवणाचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उताविळ पणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षाणिक फायद्या साठी गुंतवणुक करू नका. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा. प्रकृति अस्थिर राहील.

शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०५, ०८.

मीन: 

आजचा चंद्रयोग पाहता घरामध्ये अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना धीराने तोंड द्याल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राहील. तुमच्या नवीन योजनांना दाद मिळेल. परदेशगमनाच्या संधी मिळतील. सर्व कामे एकट्याने करणे शक्य नसल्यामुळे इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. धंद्यामध्ये अनेक स्पर्धक निर्माण होतील. नोकरी धंद्याच्या ठिकाणी हवे तसे वातावरण मिळाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. नास्तिकता वाढीस लागेल. अनाठायी खर्च होईल. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. आनंदावर विरजण पडण्या सारख्या घटना घडतील. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे.

शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.

WhatsApp channel