Dhanu Makar Kumbh Meen Rashi : मकर राशीच्या लोकांचा खर्च वाढेल! वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : मकर राशीच्या लोकांचा खर्च वाढेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : मकर राशीच्या लोकांचा खर्च वाढेल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Published May 08, 2024 10:07 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 8 May 2024 : आज ८ मे २०२४ रोजी, चंद्र अहोरात्र मेष आणि वृषभ राशीतून भ्रमण करणार आहे. याचा सर्वच राशींवर कमी अधिक प्रमाणात प्रभाव दिसून येणार आहे. धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल बुधवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज शास्त्रानुसार, नक्षत्रांच्या बदलाणे सौभाग्य योग आणि किस्तुघ्न करण जुळून येत आहेत. तसेच अमावस्या वर्ज्य दिनमान असल्याने राशीवर मोठा परिणाम दिसून येणार आहे. आज चंद्र अहोरात्र मेष आणि वृषभ राशीतून भ्रमण करणार आहे. या सर्व बदलांचा धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीवर काय परिणाम होणार हे जाणून घेऊया.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असेल. दुग्धशर्करा योगाचा उत्तम फायदा मिळेल. नवा व्यवसाय सुरु करण्याचा विचार मनात येऊ शकतो. मात्र कोणत्याही व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत अथवा आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहिल. सर्वच क्षेत्रातील लोकांना धनलाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ कराल. तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव इतरांवर निश्चितच राहील. समाजात तुमचा मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल.धार्मिक कार्यांमध्ये रुची राहील.

शुभरंगः पिवळसर शुभदिशाः ईशान्य.शुभअंकः ०६, ०९.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस त्रासदायक ठरु शकतो. विविध गोष्टींमुळे मानसिक तणाव जाणवेल. उद्योग-व्यापारात तुमचे महत्वाचे निर्णय चुकण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. सततच्या तणावामुळे मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गानी काळजीपूर्वक आर्थिक व्यवहार करावेत. सुख-चैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे. मानसिक दृष्टीकोनातून क्लेश उत्पन्न करणारा दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवा. मनाविरुद्ध प्रत्येक गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळा. अन्यथा वादाला तोंड फुटू शकते.

शुभरंगः निळा शुभदिशाः नैऋत्य.शुभअंकः ०६, ०८.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. स्वास्थ्य थोडे नरम राहील. शारीरिक थकवा जाणवेल. महत्वाच्या कामात जवळच्या व्यक्तींकडून प्रोत्साहन मिळेल. मित्रमैत्रिणी आणि जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. व्यापारात तुमची प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम राहील.जोडीदारासोबत मनमोकळा संवाद घडून येईल. मनातल्या भावना व्यक्त होतील. त्यामुळे जोडीदारासोबतचे संबंध आणखी दृढ होतील. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल.

शुभरंगः जांभळा शुभदिशाः पश्चिम.शुभअंकः ०२, ०८.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विविध घडामोडींचा असणार आहे. आज चंद्रभ्रमणात नातेवाईकांमध्ये आर्थिक व्यवहार करण्याचे टाळा. स्वभावात अस्थिरता दिसून येईल. महत्वाच्या कामात मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. प्रकृती स्वास्थ्य वरचेवर बिघडण्याची शक्यता आहे. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. हितशत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणार आहे. प्रयत्नांच्या तुलनेत धनलाभ अधिक होईल. ऑफिसमध्ये प्रमोशन मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक भागीदारासोबत नवा प्रकल्प हाती घेण्यास दिवस उत्तम आहे.

शुभरंग: पिवळा शुभदिशाः ईशान्य.शुभअंकः ०४, ०६.

Whats_app_banner