Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज शुक्रवारच्या दिवशी सूर्य मृगशीर्ष नक्षत्रात प्रवेश करणार आहे. चंद्र वृषभ व मिथुन राशीतून आणि मृगशीर्ष नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. तर चंद्र शनिशी नवमपंचम योग तयार करीत आहे. या सर्व घडामोडींमध्ये धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार ते जाणून घेऊया.
आज आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे रहाल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. कौटुंबिक सुखशांती आनंददायक वातावरण राहिल. प्रवासातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५. राबवाल.
सामाजिक क्षेत्रात लोकांची मने जिंकण्यासाठी सर्व पणाला लावाल. उपासना करूनआध्यात्मिक उंची गाठाल. नवनवीन योजना डोक्यात येतील. आणि त्या राबवण्यासाठी वाटचाल कराल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. बुद्धी व तर्कसंगत वृत्तीने कार्यात लाभ मिळण्याचे योग आहेत. व्यापारात योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. वेळेचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीमध्ये केलेल्या कामाचे महत्व वाढेल. औद्योगिक कार्यात नवीन योजनेतून लाभ होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. नोकरीत नवीन संकल्पना मांडाल.
शुभरंग: जांभळा शुभदिशा: नैऋत्य.शुभअंकः ०५, ०८.
आज नको तेथे पैसे खर्च झाल्यामुळे चिडचिड होईल. करियरमध्ये जास्त लक्ष दिल्यास यशस्वी व्हाल. कोणतेही संशोधन चांगले कराल. कामामध्ये खोट्याचा किंवा चुकीच्या गोष्टींचा आधार मात्र घेऊ नका. अशा गोष्टी तुम्हाला गोत्यात आणू शकतात.कोणताही निर्णय घेण्यात दिरंगाई झाल्यामुळे दारात आलेली संधी दार ठोठावून निघून जाण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. स्थानबदलाची शक्यता आहे. रागाचा अतिरेक टाळावा. आळसाचा अतिरेक होईल. स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होईल. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते. मानसिक क्लेश अस्वस्थता जाणवेल.
शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम.शुभअंकः ०२, ०८.
आज रोग प्रतिकारक शक्ती काहीशी कमी झाल्यामुळे रोगांना आमंत्रण द्याल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. यंत्रावर काम करताना सांभाळून रहावे. थोड्या तापट स्वभावामुळे इतरांशी फटकून वागाल. कामकाजात व्यत्यय निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताणतणावात्मक राहिल. रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. शत्रुपक्ष वरचढ राहिल. कामाच्यादृष्टीने त्रासदायक दिवस आहे. मानसिक स्वास्थ राखा.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य.शुभअंकः ०३, ०९.
संबंधित बातम्या