Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज चंद्र मंगळ, बुध,राहु,नेपच्युनशी संयोग करीत आहे. या हालचालींचा काही राशींवर नकारात्मक तर काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. सरस्वतीयोग, लक्ष्मीयोग त्याचबरोबर ग्रहणयोगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!
धनु राशीच्या लोकांसाठी कामकाजात अडथळा निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताण-तणावात्मक राहील. रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. आज तुमचा शत्रुपक्ष वरचढ राहील. तुमच्या कामात मानसिकदृष्या त्रासदायक दिवस आहे. मानसिक स्वास्थ सांभाळावे लागेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. यंत्रावर काम करताना सांभाळून रहावे. थोड्या तापट स्वभावामुळे इतरांशी फटकून वागाल. कामकाजात व्यत्यय निर्माण होईल.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०९.
मकर राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य असेल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. बुद्धी व तर्कसंगत वृत्तीने कार्यात सफलता मिळण्याचे योग आहेत. व्यापारात योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. वेळेचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीमध्ये केलेल्या कामाचे महत्व वाढेल. औद्योगिक कार्यात नवीन योजनेतून लाभ होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. नोकरीत नवीन संकल्पना मांडाल. राजकारणी आणि मुत्सद्दी स्वभावामुळे हरतऱ्हेचे डावपेच खेळायला तुम्ही तयार असाल.
शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०५, ०८.
तुमच्या कामाचे श्रेय दुसर्याला मिळेल. व्यापारी वर्गाांनी आज कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. नोकरीत वरिष्ठ सदस्यांसोबत विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका.
शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०८.
मीन राशीचे लोक आज काहीसे बंडखोर राहतील. विधायक गोष्टी कराल पण भांडखोरपणाने इतरांची नाराजीही ओढवून घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रात मितभाषी रहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. व्यापारात प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल. भागीदारासोबत सामंजस्यपूर्ण व्यवहार ठेवा. नोकरीत आपल्या मनाच्या विरोधात वातावरण निर्माण होईल. आपले विरोधक हितशत्रुकडून आपल्या विरोधात वातावरण तयार केले जाईल. त्यामुळे मन लावून काम करा.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.
संबंधित बातम्या