Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज गुरुवारच्या दिवशी जोतिष शास्त्रात अनेक महत्वाचे योग जुळून येत आहेत. आज वृषभ राशीत एक-दोन नव्हे तर तब्बल ६ ग्रहांची युती झालेली दिसून येत आहे. यामध्ये बुध आणि शुक्र एकाच राशीत आल्याने कला योग घटित होत आहेत. या सर्व महत्वाच्या घडामोडींमध्ये आजचा दिवस धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा जाणार ते जाणून घेऊया.
धनु राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. बौद्धीक कसरती करण्याबरोबरच मनोरंजन करण्याकडेही कल राहील. उद्योगधंद्यात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. घरात नोकरवर्गाचे सहकार्य न मिळाल्यामुळे नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. तुमचा मनोबल आणि आत्मविश्वास उंचावलेला असेल. कोणत्याही स्वरूपाच्या वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ नका. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. अन्यथा स्वतःचे नुकसान करून घ्याल. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. आज गुंतवणुकी साठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल.
शुभरंगः पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.
मकर राशीसाठी आज थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. जोडीदाराच्या अचानक चांगल्या वाईट वागण्यामुळे तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्बेतीची काळजी घ्या. वेळेवर औषधोपचार घ्या. काहींना परदेशात प्रवास घडुन येतील. स्वभावानुसार मानसिक चिडचिड दगदग होईल. विरोधकांचा त्रास सहन करावा लागणार आहे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. वाईट संगत अंगलट येईल. मानसिक क्लेशातून त्रासातून जावे लागणार आहे. अनैतिक कामापासुन दुर रहा अन्यथा कायद्याच्या कचाट्यात अडकाल.
शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०१, ०५.
कुंभ राशीच्या लोकांची अनेक दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. परदेशगमनाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग येतील. तुम्हाला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. तुम्ही या संधीचा नक्कीच लाभ उठवाल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. तेव्हा व्यवहार जपूनच करावा. नविन संधी प्रस्ताव येतील. तुमचा आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. घाईगडबडीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील.
शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०६, ०८.
मीन राशीच्या लोकांसाठी प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र निष्काळजीपणा करू नये. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जास्तीचे काम करावे लागेल. तुमच्या शांतीप्रिय स्वभावचा आणि गुणवैशिष्टयाचा पुरेपूर फायदा होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिनमान आहे. तुमची मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक आयुष्याचा आनंद घ्याल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहिल.तुमच्या वाणीचा इतरांवर प्रभाव राहील.
शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.