मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : धनु राशीच्या लोकांना वारसाहक्कातून मिळणार संपत्ती! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : धनु राशीच्या लोकांना वारसाहक्कातून मिळणार संपत्ती! वाचा चारही राशींचे भविष्य

Jun 05, 2024 09:53 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 5 June 2024 : ग्रहांच्या हालचालींबाबत सांगायचे तर आज कन्या राशीत केतू, कुंभ राशीत शनी, मीन राशीत राहू संक्रमण करत आहेत. धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल मंगळवारचा दिवस? वाचा चारही राशींचे भविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : जोतिषशास्त्रानुसार आज ग्रह-नक्षत्रांची मोठी हालचाल होत आहे. त्यामुळे राशीचक्रातसुद्धा अनेक घडामोडी घडत आहेत. ग्रहांच्या हालचालींबाबत सांगायचे तर आज मंगळ ग्रह मेष राशीमध्ये विराजमान आहे. तर कन्या राशीत केतू, कुंभ राशीत शनी, मीन राशीत राहू संक्रमण करत आहेत. विशेष म्हणजे आज वृषभ राशीत ग्रहांचा मोठा संयोग होत आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल ५ ग्रह एकत्र आले आहेत. वृषभ राशीत रवि, बुध, शुक्र, गुरू आणि हर्शल असे पाच ग्रह एकत्र आले आहेत. या योगांमध्ये धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असणार हे जाणून घ्या.

धनु

धनु राशीसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा वरिष्ठ देऊ करतील. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातून मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

मकर

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. सामाजिक उत्सवात सहभाग समाजातील बऱ्याच प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्काला आणण्याची संधी देईल. आपल्या वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरावर पडेल. कुटुंबामधून तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. तुमच्यासाठी अपेक्षीत व्यवहार योग्यरित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. व्यापारी वर्गास खरेदीपासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संततीविषयी चिंता मिटेल. जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल.

शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आज वैचारिक मतभेदामुळे कौटुंबिक नात्यामध्ये दुरावा येण्याचा योग आहे. पालकांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चंचलपणावर आवर घाला. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. आर्थिक व्यवहार अर्धवट होतील. वरिष्ठांची नाराजी ओढवून घेऊ नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रु पक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याबाबत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक कामात वेळ वाया घालवू नका. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

शुभरंग: जांभळा, शुभदिशाः नेॠत्य, शुभअंकः ०७, ०८.

मीन

मीन राशीच्या लोकांनी आज इतरांना पटेल रुचेल असेच वक्तव्य करा. घरामध्ये विलासी वस्तूंची खरेदी कराल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. तुमच्या नव्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी-नातेवाईकाकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहिल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणि संततीसौख्यही उत्तम असेल. घरामध्ये आनंददायी वातावरण राहिल. स्वभावातील गुणदोष मात्र टाळावेत. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. शासकिय योजनेतून लाभ होईल. आजचा दिवस अगदी उत्तम जाईल.

शुभरंग: पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.

WhatsApp channel