मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : तैतिल करणात आज मीन राशीच्या लोकांचे विवाह जुळतील! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : तैतिल करणात आज मीन राशीच्या लोकांचे विवाह जुळतील! वाचा चारही राशींचे भविष्य

May 31, 2024 07:45 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 31 May 2024 : आज चंद्र कुंभ राशीतून आणि शततारका व पुर्वा भाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल गुरुवारचा दिवस? वाचा चारही राशींचे भविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : जोतिष शास्त्रानुसार राशीचक्रात एकूण १२ राशी असतात. यामध्ये प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो. या स्वामी ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा मोठा प्रभाव या राशींवर पडत असतो. आज शुक्रवारच्या दिवशी बुध वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तर चंद्र कुंभ राशीतून आणि शततारका व पुर्वा भाद्रपदा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. या सर्वांमध्ये धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार ते जाणून घेऊया.

धनु

धनु राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असणार आहे, नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस प्रकाशन साहित्यिक यांच्याकरिता आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आणि त्या अंमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी रहिल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील.

शुभरंग: पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.

मकर

मकर राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. दिवसभरात काही अडचणी येऊ शकतात. महत्वाच्या कामांना मात्र गती येईल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे. भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोट्या आरोपांना सामोरे जावे लागेल. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कुंटुंबातील वरिष्ठ मंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष दया. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांनी नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नयेत. घरात वावरताना संयम ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिडपणा राहिल. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्‌भवतील. कुटुंबापासुन दुर जाल. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. मित्रमैत्रिण नातेवाईकांसोबत सलोख्याने वागा. प्रकृती वर लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील.

शुभरंग: जांभळा, शुभदिशाः नेॠत्य, शुभअंकः ०७, ०८.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. विवाह जुळतील.भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल. भावंडाची योग्य साथ मिळेल. आपल्या समोर नवीन व्यवसायाचा प्रस्ताव येतील. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नविन संधी आपल्याला मिळणार आहे. सौभाग्य योगात वृद्धी होईल. आर्थिकबाबींमधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. अनेक दिवसांपासुन टाळत असलेले काम आज पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०४, ०७.

WhatsApp channel