Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : जोतिष शास्त्रानुसार ग्रह-नक्षत्र एका विशिष्ट काळानंतर आपले स्थान बदलत असतात. आणि या स्थान बदलाने विविध योग जुळून येत असतात. आज चंद्र आणि गुरुच्या संयोगातून चतुर्थ दशम योग आणि गरजकरण यांची निर्मिती होत आहे. अशातच धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा जाणार हे जाणून घेऊया.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतील. मोठ्या स्वप्नांमुळे मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. प्रेमप्रकरणात झालेले गैरसमज त्रासदायक ठरतील. उद्योग व्यवसायातही काहीसा ताणतणाव राहील. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्यावे लागेल. आहारात नियमितता ठेवा. बौद्धिक कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे आज टाळा.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्यादृष्टीने चांगला दिवस आहे. नवीन प्रकल्पात गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहिल. तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. निरनिराळ्या सुचणार्या कल्पना अंमलात आणा. परदेशगमनाचा योग आहे. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. व्यवसायात कोणत्याही मोहात न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या. महत्वपूर्ण कागदपत्रे मात्र संभाळा. आरोग्य उत्तम राहील. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात.
शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०४, ०८.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. ज्या कार्याचा निश्चय कराल ती गोष्ट पार पडेपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. व्यापारी वर्गाकरीता महत्वाचा योग आहे. आज उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. नोकरदारवर्गाला बढती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. घरगुती सुविधेत वाढ होईल. महत्वाच्या कार्यात वरिष्ठाची मदत मिळेल. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नवीन कल्पना अंमलात आणाल. मिळालेल्या संधीचे सोने करा. कोणत्याही गोष्टीत विचलीत होऊ नका. शासकीय कामात यश प्राप्त होईल.
शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०५, ०८.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. लांबच्या प्रवासाचे योग जुळून येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. मनासारखे यश मिळणार आहे. परिवारात शुभ कामाचे नियोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून वारसा हक्काचे प्रकरण मार्गी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींसोबत परिचय होईल. चांगल्या विचारांचा लाभ होईल.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.
संबंधित बातम्या