Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : जोतिष शास्त्रानुसार आज बुधवारचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज विविध योग आणि तिथी जुळून येत आहेत. आज सकाळपासून दुपारी १ वाजून ४० मिनिटापर्यंत षष्ठी तिथी असणार आहे. त्यांनंतर सप्तमी तिथी सुरु होईल. तसेच आज सकाळी ८ वाजून ३९ मिनिटापर्यंत श्रवण नक्षत्र तर त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र असणार आहे. आजचा दिवस धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असणार हे जाणून घेऊया.
धनु राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. व्यवसाय असणार्यांना आपला व्यापार वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. मुलांबाबत तुमचे विचार वेगळे असतील. त्यामुळे तुमच्या मताशी मुलं सहमत होतीलच असे नाही. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. व्यवसायातून जुनी येणी वसूल होतील. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. त्यामुळे मन प्रसन्न राहिल. बोलण्यातील संभ्रम मात्र दुर ठेवा.अथवा गैरसमज होऊ शकतात. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरांवर राहिल. स्वतःच्या मनाने विचार करुनच निर्णय घ्या. अडचणी आल्या तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. नवीन ध्येयांचा-विचारांचा पाठपुरावा कराल. कार्यक्षेत्रात झालेले बदल जितक्या लवकर आत्मसात कराल तितका यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ मिळतील. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल.
शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०८.
कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कोणत्याही प्रश्नाची उकल तुमच्याकडून फार चांगली होत असल्यामुळे अनेक लोकांचे सल्लागार बनाल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणार आहे. मात्र कोणत्याही कामात अतिउत्साह आणि अतिरेकपणा टाळावा. नोकरीत अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. तुमच्या प्रयत्नांना यश येईल. मानसन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत कायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील.
शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०७, ०८.
मीन राशीसाठी आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा असणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी विचार न पटल्यामुळे ताणतणाव जाणवेल. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष दयावे लागेल. पराक्रम आणि बौद्धिक क्षमतेमुळे फायदा होईल. व्यापार उद्योगात चांगली प्रगती राहिल. खर्च मात्र विचार करून करा. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मानसन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळण्याचे योग आहेत.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०४, ०६.
संबंधित बातम्या