Dhanu Makar Kumbh Meen Rashi : वाशी राजयोगात धनु राशीला मिळणार बक्कळ पैसा! वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : वाशी राजयोगात धनु राशीला मिळणार बक्कळ पैसा! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : वाशी राजयोगात धनु राशीला मिळणार बक्कळ पैसा! वाचा चारही राशींचे भविष्य

May 28, 2024 10:07 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 28 May 2024 : आज बुध सूर्यापासून बाराव्या घरात संक्रमण करणार आहे. या संक्रमणाने वाशी नावाचा अत्यंत शुभ योग निर्माण होत आहे. धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल दिवस? वाचा चारही राशींचे भविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : जोतिष शास्त्रानुसार आज बुध सूर्यापासून बाराव्या घरात संक्रमण करणार आहे. या संक्रमणाने वाशी नावाचा शुभ योग निर्माण होत आहे. तसेच आज मंगळवारच्या चंद्र ग्रहणावर गुरुची शुभ कृपादृष्टी असणार आहे. आज गरजकरणाचा दिवस धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी लाभाचा असणार की तोट्याचा हे जाणून घेऊया.

धनु

धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यवसायिकांना मित्र आणि भागीदाराकडून सहकार्य लाभेल. परदेशगमनाचे योग जुळून येत आहेत. व्यापारीवर्गाला आर्थिक फायदयाचा दिवस आहे. आज दिवसभर आनंदी आणि ऊत्साही राहाल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी आणि मुलांसोबत चांगले संबंध राहतील. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. तुमच्या कार्यामुळे समाजात तुमच्याबद्दल मानसन्मान वाढेल. संततीकडून शुभ संदेश मिळतील. समाधानकारक दिनमान असेल.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. उतावीळपणा बाजूला ठेऊन पोक्त विचार करून कामाची आखणी करा. आज कोणत्याही क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. कुटुंबातील लहान व्यक्तींचा सल्ला मानलात तर फायद्याचे ठरणार आहे. परदेशी व्यवहार असणाऱ्यांना फायदेशीर ठरेल. हातातून निसटलेल्या संधी पुन्हा नव्याने प्राप्त होतील. राजकीय सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. मित्रमंडळींचे व कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभणार आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०५, ०९.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा अडचणींचा असणार आहे. भावंडांशी वाद होण्याची दाट शक्यता आहे. कोणतेही कागदोपत्री करार करताना तज्ज्ञांचे सल्ले घ्या. एखाद्या निर्णयात कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मानसिक दृष्टीकोनातून तणाव जाणवेल. आज काहीसा अडचणीत आणणारा दिवस आहे. नोकरीत अतिउत्साही आणि अतिरेकपणा टाळा. मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०१, ०८.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. व्यवसायात भागीदारीच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड जाईल. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद होतील. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. मानसिक उत्तेजना व विद्रोह वाढेल. व्यापार उद्योगात आज कोणतेही मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वादविवाद टाळा. व्यापार व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. अथवा विरोधकांना फायदा होईल. देवाणघेवाणीच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. दुर्घटना गंभीर दुखापतीची शक्यता आहे.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

Whats_app_banner