Dhanu Makar Kumbh Meen Rashi : मीन राशीच्या लोकांनी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये! वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : मीन राशीच्या लोकांनी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : मीन राशीच्या लोकांनी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये! वाचा चारही राशींचे भविष्य

Published May 27, 2024 09:51 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 27 May 2024 : शुक्र, सूर्य आणि गुरूचा संयोग तयार होत असून त्यामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल सोमवारचा दिवस? वाचा चारही राशींचे भविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : चंद्र प्लुटोशी युती करीत असुन गुरू, शुक्र व रविशी नवमपंचम योग करीत आहे. तसेच, शुक्र, सूर्य आणि गुरूचा संयोग तयार होत असून त्यामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. या योग-संयोगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा सोमवारचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनुः 

आज व्यवसायातून जुनी येणी वसूल विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहिल. बोलण्यातील संभ्रम मात्र दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहिल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. कलाकारांची कला बहरेल. लेखक कलावंतांना संधी मिळतील. कामातील बदल हा सुद्धा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल. उपासना करणार्‍यांना भक्ती आणि श्रद्धेची आर्द्रता जाणवेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. व्यवसाय असणार्‍यांना आपला धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. संततीसंबंधी तुमचे विचार वेगळे असतील परंतु तुमच्या मताशी मुलं सहमत होतीलच असे नाही. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. 

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

मकरः 

आज शासकीय नोकरदारासाठी यशस्वी दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतील. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. तुमची निरीक्षणक्षमता आणि कल्पनाशक्ती यांचा वापर योग्य रितीने कराल तर बऱ्याच समस्या सुटतील. पैशाची कामे होतील. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. 

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०७, ०८.

कुंभ: 

आजच्या नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहिल. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल. रात्रीचे जागरण टाळा. घरातील खर्च अपरिहार्य कारणामुळे वाढतील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. नोकरीनिमित्त घराबाहेर रहाण्याचे योग येतील. दुसऱ्यांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही. तुमच्या लहरी स्वभावाला इतरांना तोंड द्यावे लागणार आहे. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. 

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०८.

मीन: 

आज आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहील. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि संततीची विशेष काळजी घ्या. कर्ज हवे असणारांना त्याची तरतूद करता येईल. एखादी घटना अचानक घडण्याकडे परिस्थितीचा कल राहील. अशा चांगल्या वाईट घटना जास्त मनावर घेतल्या तर मनावरचा ताण वाढेल. बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल. आणि याची नोंद नक्कीच सगळीकडे घेतली जाईल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. 

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०४, ०६.

Whats_app_banner