Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज रविवारच्या दिवशी सूर्य, शुक्र आणि गुरु यांचा संयोग जुळून येत आहे. या संयोगाने षडाष्टक योगाची निर्मिती होत आहे. शिवाय आज चंद्रभ्रमण धनु राशीतून होत आहे. त्यामुळे लक्ष्मीयोग आणि नवमपंचम योग घटित होत आहे. या सर्व बदलांमध्ये धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार हे जाणून घेऊया.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. एखाद्या कार्यात मनइच्छित फळ मिळणार आहे. कुटुंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून आपल्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. स्वभावातील रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे. मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल. नवीन प्रकल्पाचा वाढ आणि विस्तार वाढणार आहे.
शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.
मकर राशीच्या लोकांना आज मानसिक अस्थिरता जाणवेल. संतीतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल. त्यांच्या करिअरसंबंधी चिंतेत पडाल. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती मात्र टाळा. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची काळजी घ्या. नवीन धोरणे योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. जमीनीच्या देवाणघेवाणीचे व्यवहार लांबणीवर टाकणेच उत्तम राहील. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या.
शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.
कुंभ राशीसाठी आज महत्वाच्या कार्यात मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्राचा खूप उपयोग होईल. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारी वर्गासाठी शुभ योग निर्माण होत आहेत. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढ़तीची संधी आहे. तुमच्या हटके कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवावे. व्यसनापासून दूर रहा. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. कला क्षेत्रातील मंडळींनी या शुभ दिवसाचा फायदा करून घ्यावा.
शुभरंग: जांभळा शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०४, ०७.
आज तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. परंतु कर्तृत्वाची वेगवेगळी क्षेत्र तुमच्यासाठी खुली होतील. मानापमानाच्या कल्पना जास्त तीव्र होतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापासारख्या घटना घडतील. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार यश लाभणार नाही. विनाकारण बडेजावपणा मिरवू नका. कोणत्याही व्यापारात व्यवहार सावधानीपूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळेल अशी परिस्थिती राहिल. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे कण्याचा प्रयत्न करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल.
शुभरंगः पिवळा शुभदिशाः ईशान्य,शुभअंकः ०२, ०६.
संबंधित बातम्या