Dhanu Makar Kumbh Meen Rashi : कुंभ राशीच्या लोकांना आज मिळणार जोडीदाराची साथ! वाचा चारही राशींचे भविष्य-dhanu makar kumbh meen rashi 25 may 2024 sagittarius capricorn aquarius pisces zodiac signs prediction ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : कुंभ राशीच्या लोकांना आज मिळणार जोडीदाराची साथ! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : कुंभ राशीच्या लोकांना आज मिळणार जोडीदाराची साथ! वाचा चारही राशींचे भविष्य

May 25, 2024 10:41 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 25 May 2024 : ग्रहांचा स्वामी ग्रह बुध आज मेष राशीत विराजमान असणार आहे. तर शुक्र, गुरु, सूर्य वृषभ राशीत आहेत. धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल शनिवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : जोतिष अभ्यासानुसार, आज ग्रह-नक्षत्रांच्या स्थानांचा विचार केल्यास, ग्रहांचा स्वामी ग्रह बुध आज मेष राशीत विराजमान असणार आहे. तर शुक्र, गुरु, सूर्य वृषभ राशीत आहेत. केतू नक्षत्र कन्या राशीत आहे. तर दुसरीकडे चंद्र आज वृश्चिक राशीत असणार आहे. या सर्व घडामोडींचा राशीचक्रातील बाराही राशींवर विशेष प्रभाव पडणार आहे. पाहूया आजच्या योगांचा धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीवर कसा परिणाम होणार आहे.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. आपापल्या क्षेत्रात यशस्वी झेप घ्याल. तरुण वर्गाला त्यांची आवडती व्यक्ती वारंवार भेटेल. त्यातून प्रेमभावना वाढीस लागेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. तुमची कार्यक्षमता पूर्वीपेक्षा अधिक वाढणार आहे. कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा नव्याने उपलब्ध होतील. नोकरीत मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. साहित्य, क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना चांगला आर्थिक लाभ होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य.शुभअंकः ०३, ०७.

मकर

मकर राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. इतरांना सहकार्य करण्यात तत्पर रहाल. तुमच्यातील कलागुण समाजासमोर आल्यामुळे लोकांची चांगली दाद मिळेल. एखाद्या गोष्टीत आशाजनक वातावरण निर्माण होईल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. महत्वाच्या कामात भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून आर्थिक लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग जुळून येत आहे. आईच्या प्रकृतिकडे विशेष लक्ष दयावे लागेल. पराक्रम व कार्य क्षमतेमुळे फायदाच होईल. व्यापार उद्योगात प्रगती होईल. खर्च करताना मात्र विचार करून करा. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मानसन्मान मिळेल. कुंटुंबासोबत धार्मिक स्थळाला भेट द्याल.

शुभरंग: जांभळा शुभदिशा: नैऋत्य.शुभअंकः ०७, ०८.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. कामाच्या ठिकाणचे वातावरण आज उल्हासित करणारे असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करुन दाखवण्याची संधी मिळेल. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. मनासारख्या गोष्टी घडत असल्याने मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. नोकरीत वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम.शुभअंकः ०२, ०८.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आज संमिश्र प्रकारचा दिवस असणार आहे. कोणताही आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. मुलांच्या संदर्भात घेतलेले निर्णय पुन्हा तपासून पहावे लागतील. बोलण्यातील संभ्रम मात्र दूर ठेवा. अथवा गैरसमज होऊ शकतात. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. इतरांवर आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहिल. कोणत्याही गोष्टीत स्वतःच्या मनाने विचापूर्वक निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. शासकीय कामकाजातून यश मिळेल. आर्थिक योजनेतून विशेष लाभ होतील. व्यापारात नवीन बदल किंवा प्रयोग यशस्वी ठरतील. वैवाहिक आयुष्यात पत्नीकडून सहकार्य लाभेल. मुलांची विद्याभ्यासात रुची वाढेल.

शुभरंग: पिवळा शुभदिशा: ईशान्य.शुभअंकः ०४, ०६.