मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : शिव-सिद्ध योग धनु राशीसाठी ठरणार लाभदायक! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : शिव-सिद्ध योग धनु राशीसाठी ठरणार लाभदायक! वाचा चारही राशींचे भविष्य

May 24, 2024 10:53 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 23 May 2024 : आज नवपंचम योगात शुक्रवारचा दिवस धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल बुधवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : जोतिष शास्त्रानुसार राशींमध्ये विविध घडामोडी घडत असतात. परंतु याचे मुख्य कारण ग्रह-नक्षत्र असतात. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे विविध योग घडून येत असतात. आणि या योगांचा सकारत्मक किंवा नकारत्मक परिणाम राशींवर पडत असतो. आज नारद जयंतीचा दिवस आहे. शिवाय आज नवपंचम योगात शुक्रवारचा दिवस धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा जाणार हे जाणून घेऊया.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. बेरोजगारांना नवीन नोकरी लागण्याची संधी उपलब्ध होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत.मोठी आर्थिक तरतूद होणार आहे. मोठ्या आर्थिक व्यवहारात फसवणूक होणार नाही याची सावधानी बाळगा. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. स्वभावातील रागीटपणावर मात्र नियंत्रण ठेवा.

शुभरंगः पिवळा शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. कला आणि संगणक क्षेत्रात असणाऱ्यांनी येणाऱ्या संधीचा वेळीच लाभ घ्यावा. अथवा संधी हातातून निसटण्याची शक्यता आहे. तुमच्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. नाहीतर नंतर गोंधळ उडेल. मित्र मैत्रिणींकडून चांगली साथ लाभेलच यात थोडी शंका वाटते. नवनविन प्रलोभने येत राहतील. तुमची मानसिकता विचलित करणाऱ्या घटना घडतील. व्यापारात काळजीपूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. मोठ्या सांपत्तिक उलाढालीत आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. जोडीदारासोबत जास्तीत जास्त संवाद साधा. त्यातून तुम्हाला मानसिक स्थिती सुधारण्यास मदत मिळेल.

शुभरंगः जांभळा शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०५, ०७.

कुंभ

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. चंद्र-बुध योगात व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. अनेक दिवसांपासून रेंगाळलेले स्थावर मालमत्ता संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या पैशांचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. क्रिडाक्षेत्रातील लोकांना योग्य संधी चालून येतील. नवीन घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. जुने मित्र सहकारी भेटतील. त्यांच्या सानिध्यात वेळ चांगला जाईल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावेत. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडथळे निर्माण होतील.

शुभरंगः निळा शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०३, ०९.

मीन

मीन राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. प्रवास चांगला होऊन तुमची करमणूक होईल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचे चांगले सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चित शक्य होईल. सामाजिक कार्यात आवर्जून भाग घ्याल. उद्योग-व्यवसायात नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे ओढा राहिल. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०४, ०८.

WhatsApp channel