मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar kumbh Meen Rashi : वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar kumbh Meen Rashi : वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल! वाचा चारही राशींचे भविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 24, 2024 12:06 PM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 24 April 2024 : आज २४ एप्रिल २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल बुधवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज चंद्र चित्रा गुरू, रवि हर्शलशी प्रतियोग करीत आहे. सिध्दी योगात व बालव करणात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनुः 

आज प्रतिकूल चंद्रभ्रमणात आपण सावधानीपूर्वक वाटचाल करणे गरजेचे आहे. द्विधा मन:स्थितीमुळे तुमचा घोटाळा होऊ शकतो. एकंदरीत तब्येत नाजूक रहाण्याकडे कल राहील. कामाचे नियोजन केले तरी त्याची कार्यवाही न केल्यामुळे कामे उलटपालट होऊन जातील. अतिरिक्त राग आणि वादविवाद टाळा. नोकरीत वारिष्ठांकडून त्रास जाणवेल. नोकरीत विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जामीन राहू नका अन्यथा फसवणुक होईल. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहिल. शारिरिक व्याधी उद्‌भवतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०५, ०९.

मकरः 

आज शनिबलं लाभल्याने लाभदायक दिवस आहे. हातात पैसा आल्या मुळे बरीच देणीही देऊन टाकाल. व्यवसायात कोणतेही काम पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल. यामुळे रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरी धंद्यात काही ठोस बदल कराल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती होईल. कामाप्रती सजग रहा. आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगल कार्य घडतील. विदयार्थ्याच्या विद्याभ्यासात प्रगती होईल. संततीबद्दल समाधान व्यक्त कराल. गृहस्थी जीवन जोडीदाराकडून आणि कुटुंबातील वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. आपली कामे नियोजनात्मक पद्धतीने सुरुळीत घार पाडाल. व्यापारात प्रगतीकारक दिवस असुन अचानक आर्थिक लाभ घडतील. आज केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. आरोग्य उत्तम राहील.

शुभरंगः निळा शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०५, ०९.

कुंभः 

आज चंद्रबल उत्तम असल्याने अत्यंत शुभ दिवस असेल. नवीन प्रॉपर्टी संबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. नोकरी व्यवसायात इतर लोकांचे डावपेच ताबडतोब लक्षात येतील. पैशाची आवक चांगली राहील. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहमान आहे. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश प्राप्त होईल. नोकरदारास सलोख्याचे वातावरण अनुभवता येईल. धार्मिक अध्यात्मिक प्रसंगातून आत्मविश्वास मिळवू शकाल. व्यापारिक प्रकरणात जवाबदारी वाढणार आहे. आपसातील वाढ समझदाराने मिटवा. भावडांशी वादविवाद टाळा. सामाजिक कार्यक्रम साहित्यिक चळवळ व्यासपीठ इत्यादी माध्यमातून आपला नावलौकिकेत वाढ होईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी रहाल.

शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

मीनः 

आज शुभ चंद्र भ्रमणात आर्थिक कामे मनासारखी घडतील. संशोधन क्षेत्रात काम करणार्‍यांची प्रगती होईल. परिस्थितीचा उत्तम आढावा घेताना स्वतःची मर्यादा ओळखून परिपूर्ण काम कराल. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आपपल्या क्षेत्रात योग्य गुरूवर्य मंडळी भेटतील. पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील. आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ मिळेल. आनंद प्राप्त होईल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील. मानसिक सौख्य लाभेल. आपला छंद जोपासाल. नवनवीन कल्पना सुचतील. दिनमान उत्तम असल्याने अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. शासकीय कामकाज राजकीय क्षेत्रातील व्यक्तीना आज अनुकुलता लाभेल.

शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.

WhatsApp channel