Dhanu Makar Kumbh Meen Rashi : नीचभंग राजयोगात धनु राशीच्या लोकांची स्वप्ने होणार साकार! वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : नीचभंग राजयोगात धनु राशीच्या लोकांची स्वप्ने होणार साकार! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : नीचभंग राजयोगात धनु राशीच्या लोकांची स्वप्ने होणार साकार! वाचा चारही राशींचे भविष्य

May 23, 2024 09:34 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 23 May 2024 : आज चंद्र वृश्चिक राशीमध्ये संक्रमण करणार आहे. या चंद्रभ्रमणाने आज नीचभंग राजयोगाची निर्मिती होत आहे. धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल बुधवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : जोतिषशास्त्रानुसार आज चंद्र राशीचक्रातील आठवी राशी वृश्चिकमध्ये संक्रमण करणार आहे. या चंद्रभ्रमणाने आज नीचभंग राजयोगाची निर्मिती होत आहे. सोबतच गरजकरण योगसुद्धा घटित होत आहे. आज या राजयोगात धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार हे जाणून घेऊया.

धनु

धनु राशीच्या लोकांना आज आपले उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. एखाद्या गोष्टीत अपेक्षित यश संपादन करता येईल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. आणि व्यापाराचा विस्तार होईल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. इतरांना मदत करताना सावधगिरी बाळगा अथवा तुमची फसवणूक होऊ शकते. आर्थिक व्यवहार करताना पैशांची गुंतवणूक करताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. मुलांकडून सर्वच बाजूने आनंददायक बातम्या मिळतील. विवाहित लोकांनी आपल्या जोडीदारासोबत सामंजस्य दाखवून वर्तवणूक करावी. त्यामुळे नातेसंबंध आणखी घट्ट होतील.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवस संमिश्र फलदायी आहे. कामानिमित्त प्रवास करण्याचा योग येईल. परंतु प्रवासामध्ये प्रकृती व चीजवस्तूंची काळजी घ्यावी लागेल. मनाप्रमाणे गोष्टी घडत असल्याने मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहिल. बेरोजगारांना नोकरीची चांगली संधी मिळेल. घरातील वरिष्ठ मंडळी विशेषत आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अथवा जुनी दुखणी नव्याने त्रास देऊ शकतात. क्रीडा क्षेत्रातील लोकांना यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लागणार आहे. तरुणवर्गास मनासारखी नोकरी मिळेल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. शासकीय सेवेशी संबंधित व्यक्तीला मोठया अधिकाराची नोकरी मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. समाजात तुमची मानप्रतिष्ठा वाढेल.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०१, ०८.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांनी आज आपले मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. आर्थिक प्रगती करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्यही जपा. कामानिमित्त धावपळ झाल्याने शारीरिक थकवा जाणवेल. व्यवसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती तुम्हाला वाटेल. प्रेमीयुगलांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. वैचारिक मतभेद होतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या साधेपणाचा गैरफायदा कोणी घेणार नाही याची विशेष काळजी घ्या. घरातील सदस्यांसोबत मोकळेपणाने संवाद साधून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न कराल. आणि त्यामध्ये तुम्हाला यशसुद्धा मिळेल.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.

मीन

मीन राशीच्या तरुणांना प्रेम आणि कर्तव्य यामध्ये पेचात टाकणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे मनावर थोडासा ताणसुद्धा येईल. अपेक्षित कार्य पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. अपेक्षित यशासाठी प्रयत्न आणि कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. जाहिरात मीडिया क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची अनुकूलता लाभेल. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे. बुद्धिमत्ता चांगली असूनदेखील स्वतःच्या अडचणी सोडवताना दमछाक होईल. कामाच्या बाबतीत वरिष्ठांचा काहीसा ताण राहील.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

Whats_app_banner