मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : विषयोगात कुंभ राशीला होणार विरोधकांचा त्रास! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : विषयोगात कुंभ राशीला होणार विरोधकांचा त्रास! वाचा चारही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 22, 2024 09:44 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 22 May 2024 : चंद्रभ्रमणासोबतच आज सूर्य वृषभ राशीत राहून गुरु आणि शुक्राशी युती बनवणार आहे. धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल मंगळवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज बुधवार २२ मे २०२४ रोजी, चंद्र स्वाती नक्षत्रातून निघून विशाखा नक्षत्रात संक्रमण करणार आहे. चंद्रभ्रमणासोबतच आज सूर्य वृषभ राशीत राहून गुरु आणि शुक्राशी युती बनवणार आहे. त्यामुळे गरजकरण, विषयोग, नवपंचम योग असे विविध योग घटित होत आहेत. या सर्वांचा धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीवर आज कसा प्रभाव पडणार ते जाणून घेऊया.

धनु- 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज तुम्ही थोड्या तापट स्वभावामुळे इतरांशी फटकून वागाल. कामकाजात व्यत्यय निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताण तणात्मक राहिल. रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष राहणार नाही. शत्रुपक्ष वरचढ राहिल. कामासाठी मानसिकदृष्ट्या त्रासदायक दिनमान आहे. मानसिक स्वास्थ सांभाळा. अथवा आजारी पडू शकता.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०९.

मकर- 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायक असणार आहे. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे इतरांना तुमचा आदर वाटेल. बुद्धी आणि तर्कसंगतवृत्तीने कार्यात सफलता मिळण्याचे योग आहेत. व्यापारात योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. वेळेचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीमध्ये केलेल्या कामाचे महत्व वाढेल. औद्योगिक कार्यात नवीन योजनेतून लाभ होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. नोकरीत नवीन संकल्पना मांडाल. तुमच्या कलाकौशल्यांचे कौतुक होईल.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०८.

कुंभ- 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढउतारांचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी मात्र तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळेल अशी स्थिती आहे. व्यापारी वर्गाांनी आज कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. नोकरीत वरिष्ठ सदस्यांसोबत विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या कारवायांना बळी पडणार नाही याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०५, ०८.

मीन

मीन राशीचे लोक आज विधायक गोष्टी करण्यावर भर देतील. मात्र भांडखोरपणाने इतरांची नाराजीही ओढवून घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रात मितभाषी रहा अथवा अडचणीचा सामना करावा लागेल. व्यापारात प्रतिकुल परिस्थिती निर्माण होईल. व्यवसायात भागीदारासोबत सामंजस्यपूर्ण व्यवहार ठेवा. नोकरीत आपल्या मनाच्या विरोधात वातावरण निर्माण होईल. आपले विरोधक हितशत्रुकडून आपल्या विरोधात वातावरण तयार केले जाईल. त्यामुळे काहीसा मनस्ताप होईल. मन लावून काम करा. व्यापारात नवीन योजना असतील तर आज टाळा.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.

WhatsApp channel