मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : धनु राशीच्या लोकांना आज नोकरीत बढतीचा योग! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : धनु राशीच्या लोकांना आज नोकरीत बढतीचा योग! वाचा चारही राशींचे भविष्य

May 21, 2024 10:12 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 21 May 2024 : आज चंद्रच्या संक्रमणामुळे षडाष्टक योग्य, गजकेसरी योग आणि राजयोग घटित होत आहेत. या योगात धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल मंगळवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : ग्रह-नक्षत्रांच्या स्थान बदलांमुळे अनेक शुभ-अशुभ योग जुळून येत असतात. या बदलांना अनुसरुन राशींचे भविष्य ठरवले जाते. त्यामुळे ग्रहांच्या हालचालींना जोतिषशास्त्रात विशेष महत्व आहे. आज चंद्रच्या संक्रमणामुळे षडाष्टक योग्य, गजकेसरी योग आणि राजयोग घटित होत आहेत. या सर्व योगांचा प्रभाव राशीचक्रातील शेवटच्या चार राशी असलेल्या धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीवर कसा पडणार आहे ते जाणून घेऊया.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. नोकरीमध्ये तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. कलाक्षेत्रातील महिलांना काळ अनुकूल असल्याने प्रगतीच शिखर सहजपणे सर करतील. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेने अधिक लाभ होईल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी आज दिवस उत्तम आहे. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. घरामध्ये सजावट करण्याचा योग जुळून येईल. त्यामुळे घरातील वातावरण अगदी आनंदी राहील. घरी एखाद्या विलासी वस्तूची खरेदी कराल.

शुभरंगः पिवळा शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०९.

मकर

मकर राशीसाठी आजचा दिवस काहीसा चढ-उतारांचा असणार आहे. कार्यातील अनिश्चिततेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताणतणात्मक राहील. मान अपमानाचे प्रसंग घडतील. नोकरीत वातावरण अनुकुल राहील. शासकीय कामकाजाकरिता फलदायी दिवस आहे. कायदेशीर कामात विलंब होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळणार आहे. प्रेम प्रकरणात विरोधाला सामोरे जावे लागेल. महत्वाची कागदोपत्रे सांभाळा अथवा गहाळ होण्याची शक्यता आहे. सुखचैनीच्या वस्तूत खर्च वाढेल. मात्र आर्थिकदृष्ट्या स्थिरता असल्याने फारसे काही वाटणार नाही. कुटुंबातील सदस्यांना तुमचे विचार रुचणार नाहीत. त्यामुळे वादविवाद होण्याची शक्यता आहे. अशावेळी रागावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. परदेशी जाण्याचा विचार असेल तर अडचणी उद्भवतील.

शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आज मंगळवारचा दिवस मध्यम फलदायी असणार आहे. कोणत्याही गोष्टीत विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांवर लक्ष ठेवा. अथवा ते वरचढ ठरु शकतात. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लोकांचा विरोध आणि असहकार्य लाभेल. मनाप्रमाणे गोष्टी न झाल्याने मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. मित्रमैत्रिणीबरोबर युक्तिवाद टाळावेत. मनात असंतोष निर्माण होईल. अहंकारपणा नियंत्रणात ठेवावा अथवा हातात आलेल्या संधी निसटतील. प्रत्येक गोष्टीत जास्तच भावनिक होत असलयाने पदरात निराशा पडेल.

शुभरंग: जांभळा शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०४, ०७

मीन

मीन राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. प्रगतीचा मार्ग समजावून घेताना कष्ट करण्याची तयारी दाखवलात तर यश निश्चित मिळेल. एखाद्या क्षेत्रात मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर मात्र टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. वाईट सवयीचा त्याग करा. मनाची उद्विग्नता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या मनारुद्ध जाणे टाळा. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत. मुलांकडून काही बाबतीत त्रास होईल. त्यांच्याशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. मन चिंताग्रस्त राहील. मनावर संयम ठेवा. मीन राशीच्या लोकांवर आज षडाष्टक योगाचा प्रभाव असलयाने आळशीपणा वाढेल. त्यामुळे हातातील कामे रेंगाळतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.

WhatsApp channel