Dhanu Makar Kumbh Meen Rashi : मीन राशीच्या व्यक्तिंची रेंगाळलेली कामे पूर्ण होतील! वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : मीन राशीच्या व्यक्तिंची रेंगाळलेली कामे पूर्ण होतील! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : मीन राशीच्या व्यक्तिंची रेंगाळलेली कामे पूर्ण होतील! वाचा चारही राशींचे भविष्य

Updated May 20, 2024 11:47 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 20 May 2024 : आज सिद्धि योग आणि कौलव करणात धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तिंसाठी कसा राहील सोमप्रदोषचा दिवस जाणून घ्या.

धनु,मकर,कुंभ आणि मीन
धनु,मकर,कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : ग्रह-नक्षत्राच्या स्थानबदलातून विविध शुभ-अशुभ योग जुळून येत असतात. आजसुद्धा असेच अनेक योग जुळून आले आहेत. आज सोमवार २० मे २०२४ रोजी चित्रा नक्षत्र, सिद्धी योग व कौलव करणात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनु: 

आज व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. तरुणांच्या आवडी निवडी बदलत राहतील. मनाप्रमाणे खरेदी कराल. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. बेरोजगारांना नोकरी मिळेल. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. 

शुभरंग: पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०४, ०६.

मकरः 

आज व्यापारात भागीदारा सोबत वादविवाद टाळा. कलह होण्याची शक्यता राहिल. मोठी आर्थिक मोठी आर्थिक हानी फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा रहिल. छोट्याशा कारणाने मन दुखावेल. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. शारीरिक दृष्टीकोनातून मधुमेह पोटाचे विकार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या. परदेशगमनाचे योग येतील. आर्थिक नवीन गुंतवणूक कराल. घरामध्ये अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. स्वतःच्या मताबरोबर इतरांचाही विचार करावा लागेल. वैवाहिक जीवनात कधी नव्हे ते जोडीदाराच्या मना सारखे वागल्यामुळे सौख्याचा अनुभव घ्याल. संततीच्या मनाचा आदर केल्यामुळे दोन पिढ्यांमधील अंतर कमी होईल. त्यामुळे मुलेही खूष राहतील. 

शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०६, ०८.

कुंभः 

आज योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहिल. कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष दया. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल. त्यामुळे समाजात मान मिळेल. घरामध्ये नवीन येणाऱ्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पेलाव्या लागतील. याचा थोडासा ताणही येईल. नवे मार्ग आपणास सापडतील. लांबचे प्रवास आनंददायक होतील. नोकर वर्गावर विसंबून न राहणे व्यवसायिकांना कमी त्रासाचे आहे. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला बहुमाना बरोबरच प्रसिद्धीही मिळेल. 

शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०८.

मीन: 

आज कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. साहित्यिक क्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार वाढेल. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहयोग आहे. संशोधन क्षेत्रात काम करणारांची प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल.

शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.

Whats_app_banner