मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : कुंभ राशीच्या लोकांचा तणाव वाढणार! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : कुंभ राशीच्या लोकांचा तणाव वाढणार! वाचा चारही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 19, 2024 10:11 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 19 May 2024 : आज वज्र योग आणि बव करणात धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तिंसाठी कसा राहील सुट्टीचा दिवस जाणून घ्या.

धनु, मकर, कुंभ, मीन
धनु, मकर, कुंभ, मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : ग्रह-नक्षत्राच्या स्थानबदलातून विविध शुभ-अशुभ योग जुळून येत असतात. आजसुद्धा असेच अनेक योग जुळून आले आहेत. आज रविवार १९ मे २०२४ रोजी अमृत सिद्धी योग, सिद्धी योग, हस्त नक्षत्र, वज्र योग, बव करण एकत्र आल्याने संयोग जुळून येत आहे. धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज कोणत्याही क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस आहे. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. कार्यामध्ये प्रोत्साहन मिळेल. मित्रमैत्रिणी आणि जोडीदारांकडून महत्वाच्या कामात सहकार्य लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा आणखी उंचावेल. आज सुट्टीच्या दिवशी गृहसौख्य अगदी उत्तम आहे. प्रेमप्रकरणात जोडीदारासोबत संबंध अधिक दृढ होतील. नोकरदारवर्गाला कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळेल. त्यामुळे तुमचा नावलौकिकही वाढेल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना आखाल.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.

मकर

मकर राशीसाठीसुद्धा आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला कोणत्याही कामात प्रयत्नांच्या तुलनेत अधिक लाभ मिळेल. नोकरीत बढती मिळण्याचा योग आहे. तुमचे काम पाहता वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहिल. मित्रांकडून आर्थिक गुंतवणुकीचे प्रस्ताव येतील. कुटुंबात मंगलकार्याचे नियोजन कराल. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष द्या, अथवा आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. नातेवाइकांकडून शुभ वार्ता ऐकायला मिळतील. कामानिमित्त परदेशी जाण्याचा योग येईल.

शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०६, ०८.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा आहे. आज व्यापारात आपले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील. ताणतणावामुळे मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यापारीवर्गानी घाईगडबड न करता काळजीपूर्वक व्यवहार करावेत. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे. मानसिक दृष्टीकोनातून वादविवाद उत्पन्न करणारा दिवस आहे. नोकरदारवर्ग नव्या नोकरीच्या शोधात राहतील. तुमच्या महत्वाच्या निर्णयात कुटुंबातील सदस्य पाठीशी राहतील. घरातील वातावरण सामान्य असेल.

शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०८.

मीन

मीन राशीतील लोकांना राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती पाहून समाधान होईल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. बेरोजगारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. आज तुमची धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यातील रुची वाढेल. अनेक दिवसांपासून सुरु असलेले छोटे-मोठे कौटुंबिक वाद आज संपुष्ठात येऊन प्रेम वाढीस लागेल. संध्याकाळी जवळच्या व्यक्तींसोबत आनंदी वेळ जाईल.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०२, ०४.

WhatsApp channel