Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : जोतिष शास्त्रात राशीभविष्याला विशेष महत्व आहे. राशिचक्रात तब्बल १२ राशी असतात. ग्रह नक्षत्रांच्या हालचालींचा या राशींवर मोठा प्रभाव असतो. मुख्यत्वे या हालचालींवरुनच राशीभविष्य ठरत असते. जोतिष शास्त्रात या शुभ-अशुभ योगांबाबत उपाय योजनाही सांगितल्या जातात. आज होत असलेल्या ग्रहांच्या स्थान बदलांचा धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीवर काय परिणाम होणार ते जाणून घेऊया.
व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढ़तीची संधी आहे. कल्पना शक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. व्यसनापासून दूर रहा. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. कला क्षेत्रातील मंडळींनी या शुभ दिवसाचा फायदा करून घ्यावा. पत्नीकडून अपेक्षेप्रमाणे साथ मिळेल.आज मघा नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण पाहता घरात किंवा घराबाहेर वादविवाद निर्माण झाले तर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. विश्वास सिद्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न कराल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची रेंगाळलेली कामे मात्र पार पडतील. याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्राचा खूप उपयोग होईल. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारी वर्गासाठी शुभ योग निर्माण होत आहेत.
शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.
मकर राशीच्या लोकांसाठी कुटुंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून तुमच्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. स्वभावातील रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची लौकिकता वाढेल. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार वाढणार आहे.आज चंद्र हर्शल नवमपंचम योगात नवीन योजना यशस्वी होतील. कामात थोडे धाडस दाखवा. आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांचे नियोजन चाणाक्षपणे कराल व त्यात यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे.
शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.
कुंभ राशीच्या लोकांना आज केलेल्या कामात अपेक्षेनुसार यश लाभणार नाही. बडेजावपणा मिरवू नका. व्यापारात व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळेल अशी परिस्थिती राहिल. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे कण्याचा प्रयत्न करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. आज चंद्र अनिष्ट स्थानातून गोचर करत असल्याने स्थानातून खर्चाला अनेक वाटा फुटतील. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. परंतु कर्तृत्वाची वेगवेगळी क्षेत्र तुमच्यासाठी खुली होतील. मानापमानाच्या कल्पना जास्त तीव्र होतील. नोकरीत ताण वाढेल.
शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०४, ०७.
व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापारी वर्गासाठी बर्याच संधी प्राप्त होतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी रहाल. नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील. भावाकडून नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. आज ग्रहांचा नवमपंचम योग पाहता करियरमध्ये नवी उंची गाठाल. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग जुळून येऊ शकतात. तुम्हाला एखाद्या विषयामध्ये जितके ज्ञान असेल त्याप्रमाणे पैसा निश्चित मिळणार आहे. त्या दृष्टीने पुढे जायला हरकत नाही. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल लाभ प्राप्त होईल. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता शुभ योग आहे.
शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०९.
संबंधित बातम्या