मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : मीन राशीच्या लोकांना होणार विरोधकांचा त्रास! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : मीन राशीच्या लोकांना होणार विरोधकांचा त्रास! वाचा चारही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 15, 2024 10:46 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 15 May 2024 : आज शनी आणि चंद्रामध्ये समसप्तक योगसुद्धा तयार होत आहे. या योगात धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल बुधवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज बुधवार १५ मे २०२४ रोजी चंद्र आश्लेषा आणि मघा नक्षत्रातून तसेच कर्क आणि सिंह राशीतून भ्रमण करणार आहे. तसेच शनी आणि चंद्रामध्ये समसप्तक योगसुद्धा तयार होत आहे. या सर्व बदलांचा परिणाम धनु, मकर, कुंभ आणि मीन या चार राशींवर कसा होणार आहे याबाबत जाणून घ्या.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अडचणींचा असेल. चुकीच्या संगतीमुळे तुमच्यावर आळ येण्याची शक्यता आहे. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा अथवा जुने आजार त्रास देतील. कुंटुंबातील वरिष्ठ मंडळीच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष दया. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. ध्रुव योगात अनपेक्षित घटना घडण्याची जास्त शक्यता आहे. आज धनु राशीसाठी चंद्रभ्रमण हे अशुभ स्थानातून होत आहे. व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळा. अडचणी येऊ शकतात. कामाची गती कमी होईल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे.

शुभरंग: पिवळा शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०६.

मकर

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. चांगल्या संधींना आपल्या हातातून जाऊ देऊ नका. करिअरची गती काहीशी कमी होताना दिसेल. नोकरीत नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होतील. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे.

शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आज सौभाग्य योगात वृद्धी होईल. आर्थिकबाबींमधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. नोकरीत उपयोगी चर्चा घडून येतील. अनेक दिवसांपासून टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्यादृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. व्यापारात अधिक कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम हाती घ्याल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. एखाद्या विषयात ठाम निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने देणी वसूल होतील. लग्नसाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तींचे विवाह जुळतील.क भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल. भावंडाची योग्य साथ मिळेल. तुम्हाला नवीन व्यवसायाचा प्रस्ताव मिळेल. युवकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे.

शुभरंग: जांभळा शुभदिशाः नेॠत्य, शुभअंकः ०७, ०८.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असणार आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही, याबाबत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक कामात वेळ वाया घालवू नका. योग व व्यायामात सातत्य ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. वैचारिक मतभेदामुळे घरातील सदस्यांसोबत खटके उडतील. पालकांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चंचलतेवर आवर घाला. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

WhatsApp channel