Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज चंद्र प्लुटोशी षडाष्टक योग करीत असून, विष्टी करणात आणि सुकर्मा योगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!
आज चंद्र गुरूच्या नक्षत्रातुन गोचर करत आहे. व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. कर्जफेड करण्या साठी अनुकूल दिवस आहे. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. तुमच्या स्वभावा तील वेगळे कंगोरे प्रकर्षाने दिसून येतील. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. गायन कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहे. आपले आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहणार आहे.
शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.
आज चंद्र अनिष्ट स्थानातून गोचर करत असल्याने कर्जप्रकरण काळजीपूर्वक हाताळा. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार केल्यास निराश होण्याची पाळी येणार नाही. धडाडी दाखवाल परंतु अशावेळी कोणताही अविचार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताणतणात्मक राहिल. व्यवसायिकांचे उद्योगधंदयात लक्ष कमी होईल. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. व्यापारात सामंजस्य पणाची भुमिका घ्यावी. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका.
शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०१, ०८.
आज सुकर्मा योगात बुद्धीला विशिष्ट झेप देणारे ग्रहमान असल्यामुळे त्याचा फायदा होईल. मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद अधिकच दुणावेल. जगा वेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहिल. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहिल. घरातील वरिष्ठ मंडळी विशेषत आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लागणार आहे. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. सामाजिक कार्यात आपला लौकीक सांभळण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.
शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०५, ०८.
आज प्लुटो-चंद्र संयोगात धंद्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामे मिळतील. तुमची मते बेधडकपणे मांडाल आणि वाहवा मिळवाल. घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष रहातील. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहिल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. देवधर्म पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल. वैवाहिक जोडीदाराला कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करता येईल.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.