Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज आज मंगळवारी, रवि राशीपरिवर्तन करीत वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तर सप्तमीचा चंद्र कर्क राशीत भ्रमण करत आहे. चंद्रदेव गुरू आणि प्लुटोशी प्रतियोग योग करीत असल्याने वृद्धी योगाची निर्मिती होत आहे. या सर्व शुभ योग-संयोगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!
धनु राशीसाठी आजचा दिवस चढ उतारांचा असणार आहे. कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत दुहेरी वागण्याचा त्रास होईल. कुटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यापारानिमित्त प्रवास होईल. . लहानसहान गोष्टींमुळे मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा. आज चंद्रबल अनिष्ट असल्याने आर्थिक बाबतीत व्यवहार काळजीपूर्वक करा. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. शेअर मार्केटमध्ये व्यवहार करणाऱ्यांनी मोठी जोखीम घेण्याचे टाळावे. अविचाराने कर्ज काढू नका.कर्जाची परतफेड करताना त्रास होईल. व्यवसायात अनपेक्षित संकटे आली तरी त्यातून संयमाने बाहेर पडाल. वैवाहिक सौख्याच्यादृष्टीने मात्र काहीशी तडजोड करावी लागेल.
शुभरंग: पिवळा शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.
मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करायची तयारी ठेवाल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन लाभेल.आज प्लुटो-चंद्र योगात प्रयत्न यशस्वी ठरतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी राहिल्यामुळे घरातील वातावरणही आनंदी राहील. व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. कोणावर विसंबून राहिलात तर मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल.
शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०१, ०८.
कुंभ राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. एखादी मोठी खरेदी करण्याचा मूड राहील. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. आज चंद्र प्लुटोचा संयोगात कोणत्याही बौद्धिक कसरती करण्यापेक्षा व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या. ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांनी काही बाबतीत ठोस निर्णय घ्यायला हरकत नाही. व्यवसायात इतरांबरोबर सौजन्य दाखवल्यामुळे तसेच सहकार्यही तुम्हाला मिळेल. जुनी येणी वसूल होतील. अचानक पैसे मिळाल्याने आनंदी राहाल.
शुभरंग: जांभळा शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०५, ०९.
मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज कुटुंबातील लहान व्यक्तींचा सल्ला घेणे फायद्याचे ठरणार आहे. परदेशी व्यवहार असणाऱ्यांना दिवस फायदेशीर ठरेल. हातुन निसटलेल्या संधी पुन्हा नव्याने प्राप्त होतील. राजकीय सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. मित्रमंडळींचे व कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभणार आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. आज गंगा सप्तमी दिनी चंद्रबल अनिष्ट असल्या मुळे व्यापारात आर्थिक गोष्टींची सांगड योग्यरितीने घातली नाही तर मात्र नुकसान होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. वैवाहिक जीवनात अचानक काही घटना घडू शकतात. बालिशपणा बाजूला ठेऊन पोक्त विचार करून कामाची आखणी करा. आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य.शुभअंकः ०७, ०९.