Dhanu Makar kumbh Meen Rashi : मकर राशीच्या लोकांना उत्तम मोबदला मिळणार, वाचा चारही राशींचे भविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar kumbh Meen Rashi : मकर राशीच्या लोकांना उत्तम मोबदला मिळणार, वाचा चारही राशींचे भविष्य!

Dhanu Makar kumbh Meen Rashi : मकर राशीच्या लोकांना उत्तम मोबदला मिळणार, वाचा चारही राशींचे भविष्य!

Published Apr 14, 2024 10:51 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 14 April 2024 : आज १४ एप्रिल २०२४ रोजी, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल रविवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ, मीन
धनु, मकर, कुंभ, मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज मंगळ शनिशी नवमपंचम योग निर्माण होत आहे. पद्मक योगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा सुट्टीचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनुः 

आज अनिष्ट चंद्रभ्रमणात सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. तुमचा अहंकार कधी दुखावेल हे सागता येत नाही आणि त्यातून कौटुंबिक वातावरणही निरोगी नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरच होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध रहा. व्यसनी मित्रांपासून दुर रहा. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे शक्यो टाळा. आरोग्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल.

शुभरंगः पिवळसर, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

मकरः 

आज पद्मक योगात खरेदी आणि शुभ कामासाठी दिनमान मंगलमय आहे. घरातील वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. लोकप्रियता समाजकारणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. या क्षेत्रा मध्येही मोहाचे क्षण तुमची पाठ सोडणार नसल्या मुळे विवेक ठेऊन वेळीच सावध रहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे.

शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

कुंभः 

आजच्या चंद्रगोचरात कामाचे उत्तम नियोजन करणार आहात. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल.

शुभरंगः निळा शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०४, ०८.

मीनः 

आज मंगळ- शनिशी होणारा नवमपंचम योग पाहता गोचर चंद्रभ्रमणात धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. सद्गुरूंचा वरदहस्त राहील. तुमच्यातील सद्गुणांची लोक कदर करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेशगमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहिल. सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल. घरासंबंधी समस्या दूर होतील.

शुभरंग: पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.

Whats_app_banner