मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : गरज करणात मकर राशीच्या लोकांनी मानसिक आरोग्य जपावे! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : गरज करणात मकर राशीच्या लोकांनी मानसिक आरोग्य जपावे! वाचा चारही राशींचे भविष्य

Jun 13, 2024 11:09 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 13 June 2024 : गरज करणात आजचा दिवस धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा जाणार ते पाहूया.

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज ग्रह-नक्षत्रांची दिशा आणि स्थान काय आहे त्यावरुन राशींचे भविष्य ठरत असते. या हालचालींमुळे काहींना दिवस फायदेशीर ठरतो तर काहींना संमिश्र स्वरुपाचा ठरतो. आजसुद्धा ग्रह-नक्षत्रांच्या स्थान बदलामुळे वज्र योग आणि गरज करणची निर्मिती होत आहे. यामध्ये आजचा दिवस धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असणार ते जाणून घेऊया.

धनु

आज आर्थिक लाभ चांगले होतील. नोकरीत नवीन कल्पनांचा वापर करून कामाचे नियोजन कराल. तुम्हाला अहंकारी वृत्तीचा त्याग करावा लागेल. जवळचे मित्र आप्तेष्ट संबंध तुटण्याची शक्यता आहे. माणसे दुरावली जातील अशी वर्तणूक टाळावी. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्याकडे लक्ष दया. व्यापारात आर्थिकबाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. नवीन व्यापारास प्रारंभ करण्यासाठी अशुभ दिवस आहे.आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सतर्क रहा. फसवणूक आर्थिक हानी संभवते.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.

मकर

घरात आणि घराबाहेर मानसिक अस्वस्थता जाणवेल. मात्र आर्थिक समाधान मिळाल्यामुळे काहीसा आधार मिळेल. जवळच्या लोकांसोबत थोडे गैरसमज होण्याची शक्यता आहे. ज्ञान आणि व्यवहार यांच्या योग्य नियोजनाचा मेळ घातला तर काही गोष्टी फायद्याच्या ठरतील. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. जोडीदाराच्या आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. सावधगिरी न बाळगता कोणतेही काम अंगावर घेऊ नका. नाहीतर कठीण प्रसंगाशी झगडावे लागेल.

शुभरंगः निळा, शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०५, ०८.

कुंभ

नोकरी व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग वेगात राहतील. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली आणि कल्पना शक्ती यात सुधारणा होईल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्या कुवतीपेक्षा मोठी जबाबदारी स्विकारू नये. आरोग्य आणि मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याबाबत काळजी घ्या.

शुभरंगः जांभळा, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०१, ०७.

मीन

आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. त्यामुळे पथ्यपाणी सांभाळणे हिताचे ठरेल. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. अविचारीपणा योग्य नाही. विचारा अंतीच निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. कार्यक्षेत्रात तुमच्याविषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. मन आणि डोके शांत ठेवणाचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उताविळपणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०६, ०९.

WhatsApp channel