मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : कुंभ राशीच्या लोकांच्या आर्थिक समस्या दूर होईल! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : कुंभ राशीच्या लोकांच्या आर्थिक समस्या दूर होईल! वाचा चारही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 12, 2024 11:57 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 12 May 2024 : आज शास्तानुसार, शशी राजयोग, रवी योग, धृती योग, शूल योग असे अनेक योग एकत्र जुळून आले आहेत. धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल रविवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज ग्रहांच्या राशीपरिवर्तनामुळे अनेक शुभ-अशुभ योग जुळून येत असतात. शास्तानुसार, शशी राजयोग, रवी योग, धृती योग, शूल योग असे अनेक योग एकत्र जुळून आले आहेत. या सर्व योगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनु

आज धनु राशीच्या लोकांसाठी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. दिवसभर अनिद्रेचा त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी विरोधक वरचढ होतील. नोकरीत होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवा. रोजगारात प्रतिस्पर्धी डोईजड होतील. आपल्या कार्यक्षेत्रात अडचणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध रहा. व्यसनी मित्रांपासून दुर रहा. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे टाळा. काही गोष्टींमध्ये तुमचा अहंकार दुखावेल. त्यातून कौटुंबिक वातावरणही बिघडण्याची शक्यता आहे. कोणत्याही कामात आनंद वाटणार नाही. व्यवसायात वेळेवर कामे पूर्ण केली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. कौटुंबिक कामाचा भार तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल

शुभरंग: पिवळा शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात दिसून येईल. ऑफिसमध्ये कामाच्याबाबतीत नवीन कल्पना नक्की मांडा. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. बुद्धी चातुर्याने विरोधकावर मात करू शकाल. कोणत्याही प्रकरणात दुसर्‍याला जामीन राहु नका अन्यथा फसवणूक, आर्थिक हानी होण्याची शक्यता राहिल. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभरटीचा दिवस आहे. एखादया विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल.

शुभरंगः निळा शुभदिशाः नैऋत्य, शुभअंकः ०४, ०८.

कुंभ

कुंभ राशीवर आज शूल योगाचा प्रभाव जाणवेल. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. कोणत्याही परिस्थितीत ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत राहाल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. नोकरीत आलेली समस्या आपल्या प्रयत्नामुळे दूर होईल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहिल. आज अत्यंत समजूतदार आणि सोशिक होऊन घरातील अनेक अडचणी सोडवाल.त्यामुळे घरात तुमच्याबद्दल आदर वाढेल.

शुभरंगः जांभळा शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. घरातील ज्येष्ठ आणि छोट्यांमध्ये मतभेद उद्भवतील. परंतु तुम्ही वेळीच सर्व गोष्टी उघड बोलून वातावरण थंड कराल. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न कराल. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. त्यामुळे काही वेळेसाठी घरातील वातावरण तणावात्मक राहील.

शुभरंगः पिवळा, शुभदिशाः ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

WhatsApp channel