Dhanu Makar Kumbh Meen Rashi : धनु राशीला होणार विरोधकांचा त्रास! वाचा चारही राशींचे भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : धनु राशीला होणार विरोधकांचा त्रास! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : धनु राशीला होणार विरोधकांचा त्रास! वाचा चारही राशींचे भविष्य

Jun 12, 2024 10:15 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 12 June 2024 : आज शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. याचा प्रभाव धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींवर कसा पडणार ते जाणून घेऊया. वाचा चारही राशींचे भविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

आज बुधवारच्या दिवशी चंद्र सिंह राशीतून आणि मघा नक्षत्रातून संक्रमण करणार आहे. तसेच आज शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या हालचालींमध्ये धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार याबाबत जाणून घेऊया.

धनु

आज कोणतेही निर्णय घाईगडबडीत घेऊ नयेत. नोकरीनिमित्त घराबाहेर रहाण्याचे योग येतील. दुसऱ्यांनी दिलेला सल्ला तुम्हाला रुचणार नाही. तुमच्या लहरी स्वभावाला इतरांना तोंड द्यावे लागणार आहे. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहिल. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका.

शुभरंग:पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०१, ०९.

मकर

आज कोणतीही परिस्थिती समतोल स्वभावानुसार योग्य पद्धतीने हाताळाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. सिनेमासृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील. एखादी गोष्ट भाग्यात असली तर मिळते याचा प्रत्यय येईल. आपल्या महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. भाग्योदयकारक दिनमान आहे. आज आपणास नशीबाची साथ लाभणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. व्यवहार कुशलतेमुळे आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तुतीस पात्र ठराल.

शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०८.

कुंभ

एखादी घटना अचानक घडण्याकडे परिस्थितीचा कल राहील. बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल. आणि याची नोंद नक्कीच सगळीकडे घेतली जाईल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहिल. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. 

शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०७, ०८.

मीन

अचानक येणाऱ्या खर्चांचा विचार करुन आधीच पैशांची बचत करुन ठेवावी. गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल. नोकरीत नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही. तुमच्या बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मानसन्मान वाढेल. पुढील काळात तुमच्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. तुमच्याकडून वाद निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन मित्र परिवार जोडला जाईल.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

Whats_app_banner