मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Dhanu Makar Kumbh Meen Rashi : धनु राशीच्या लोकांच्या हाती नवीन प्रस्ताव येतील! वाचा चारही राशींचे भविष्य

Dhanu Makar Kumbh Meen Rashi : धनु राशीच्या लोकांच्या हाती नवीन प्रस्ताव येतील! वाचा चारही राशींचे भविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 11, 2024 11:10 AM IST

Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces prediction 11 May 2024 : चंद्राचा शनिशी नवमपंचमयोग निर्माण होत असुन सुकर्मा योग जुळून येत आहे. धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस? वाचा चारही राशींचे राशीभविष्य!

धनु, मकर, कुंभ आणि मीन
धनु, मकर, कुंभ आणि मीन

Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज विनायक चतुर्थीचा शुभ दिवस आहे. तसेच चंद्र मिथुन राशीतून आणि मंगळ व राहूच्या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. शनिशी नवमपंचमयोग निर्माण होत असुन सुकर्मा योग देखील जुळून येत आहे. ग्रह नक्षत्रांच्या या बदलांमुळे आजचा दिवस धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी कसा असेल हे जाणून घ्या.

धनु

धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला ठरणार आहे. जोडीदाराची विशेष साथ लाभणार आहे. जोडीसारासोबत संवाद होऊन जवळीकता वाढणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणार आहे. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा टाळावा. नोकरीत अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. रखडलेली कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील.

शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०४, ०६.

मकर

मकर राशीसाठी आज शनिवारचा दिवस उत्तम असणार आहे. विनायक चतुर्थीनिमित्त श्रीगणेशाची विशेष कृपा मकर राशीवर असणार आहे. मनासारख्या गोष्टी घडत असल्याने, मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायात भागीदाराकडून सहकार्य लाभेल.

शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०८.

कुंभ

कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा असणार आहे. आरोग्य आज नरमगरम स्वरुपाचे राहील. नोकरीच्या ठिकाणी आर्थिक बाबतीत वाढ होईल. महत्वाच्या कामात भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग जुळून येत आहे. आईच्या प्रकृतिकडे विशेष लक्ष दयावे लागेल. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहिल. खर्च मात्र विचार करून करा. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळण्याचे योग आहेत.

शुभरंग: जांभळा शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०७, ०८.

मीन

मीन राशीसाठी आज मध्यम स्वरुपाचा दिवस असणार आहे. कलाकार लोकांना मात्र आपली कला सादर करण्याच्या योग्य संधी उपलब्ध होतील. संततीसंबंधी तुमचे विचार वेगळे असतील परंतु तुमच्या मताशी मुले सहमत होतीलच असे नाही. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. व्यवसायातून जुनी येणी वसूल होतील. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहिल. बोलण्यातील संभ्रम मात्र दूर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. इतरांवर तुमच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहिल. कोणत्याही गोष्टीत स्वतः विचार करुन मगच निर्णय घ्या. दिवसभर आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल.

शुभरंग: पिवळा शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०७.

WhatsApp channel